VIDEO | बर्फात साधूची तपस्या !

VIDEO | बर्फात साधूची तपस्या !

मायनस डिग्री तापमान...सगळीकडे पांढराशुभ्र बर्फ...आणि याच बर्फात हा साधू तपस्या करतोय...अंगावर बर्फ असूनही याच्या शरीराला काहीच फरक पडत नाहीये...बघा, अंगावर बर्फ दिसतोय...पण, निवांतपणे अंगावरील बर्फ बाजूला करत असल्याचं दिसतंय...इतकंच नव्हे तर तहान लागली तर बर्फ फोडून पाणी पितो...आणि बर्फात हा साधू तपस्या करतोय..आपल्याला 14/15 डिग्री तापमानातही घराबाहेर पडणं मुश्कील होतं...मग हा साधू कसा काय एवढ्या बर्फात साधना करतोय...? याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला...

हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेण्याचा आमच्या व्हायरल सत्य टीमनं प्रयत्न केला...आरोग्याशी निगडीत हा विषय असल्याने याचा अनेकांना फायदा होऊ शकतो...यासाठी कोणता योग प्रकार करावा लागतो...? आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय करावं...? याबद्दल अधिक माहिती योगसाधक देऊ शकतात...आमच्या प्रतिनिधी योग साधकांना भेटल्या...त्यांना व्हायरल व्हिडीओ दाखवून यामागचं रहस्य काय हे जाणून घेतलं...

योग साधना केल्यामुळे अशा प्रकारे बर्फात राहणं शक्य असल्याचं अभ्यासक सांगतात...पण, कोणती योगसाधना केल्यामुळं हे शक्य आहे हेदेखील जाणून घेतलं...

बर्फामध्ये एवढा वेळ योगा करणे शक्य आहे

योगगुरुंच्या मार्गदर्शनाने ही साधना केली तर शक्य आहे

शरीरावर विजय मिळवणे हा योगाचा उद्देश आहे

आसन आणि प्राणायामच्या माध्यमातून हे शक्य आहे

हिमालयातील साधू हठयोगाचे अभ्यासक असल्याने त्यांना हे सहज शक्य आहे


योगाभ्यासात शरीराला पूर्ण बलवान करणे आणि दीर्घकाळ आहे त्या परिस्थितीत ठेवणे हे हठयोगामुळे शक्य आहे...त्यामुळं हिमालयात बर्फाने अंघोळ करणं, हे योगामुळे शक्य असल्याचं आमच्या पडताळणीत समोर आलं...


WebTittle :: VIDEO | Monk's penance in the snow!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com