VIDEO | मुंबईत होणार कचऱ्यापासून वीज निर्मिती, पाहा कसा असेल हा क्रांतिकारक प्रयोग

साम टीव्ही
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

मुंबईत कचऱ्यापासून वीजनिर्मितीला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आलाय. स्थायी समितीकडून या प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.

 

मुंबईत कचऱ्यापासून वीजनिर्मितीला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आलाय. स्थायी समितीकडून या प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.

मुंबई मनपानं एका क्रांतिकारी प्रकल्पाला चालना देण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईत कचऱ्यापासून वीजनिर्मितीला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आलाय. मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याला ग्रीन सिग्नल मिळालाय. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या बैठकीत कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रस्तावावर स्थायी समितीनं शिक्कामोर्तब केलंय. 

कचऱ्यापासून कशी होईल वीजनिर्मिती, पाहा- 

मुंबईत दररोज सुमारे 5 हजार मॅट्रिक टन कचरा गोळा होतो. या कचऱ्याची याच ठिकाणी विल्हेवाट लावली जाते. कचऱ्याची विल्हेवाट लावताना प्रदूषण होतं. 

मुंबईतील कचरा आणि प्रदूषण कमी व्हावं यासाठी पालिकेने कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. हा प्रकल्प एक हजार कोटी रुपयांचा असून 5 मेट्रीक टन कचऱ्यापासून 25 मेगाव्हॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे.

प्रदूषणमुक्त वीजनिर्मिती ही काळाची गरज आहे. त्यामुळे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा मुंबई मनपाचा हा निर्णय क्रांतिकारीच म्हणावा लागेल.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live