VIDEO | आता महाबळेश्वर मध्ये पिकणार काळा गहु ....

साम टीव्ही
गुरुवार, 3 डिसेंबर 2020
  • आता महाबळेश्वरमध्ये पिकणार काळा गहू
  • महाबळेश्वरच्या शेतकऱ्यांना येणार अच्छे दिन
  • महाबळेश्वरला मिळणार नवी ओळख
     

महाबळेश्वरमध्ये लवकरच काळा गहू पिकणार आहे. या पिकामुळे शेतकऱ्यांचे दिवस बदलणार आहेत. महाबळेश्वरला आता नवी ओळख मिळणार आहे. महाबळेश्वरमध्ये सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातायंत. त्याचाच एक भाग म्हणून आता महाबळेश्वरला लवकरच काळा गहू पिकणार आहे. काळा गहू अत्यंत दुर्मिळ आणि शरिराला पौष्टिक असतो, या पिकामुळे आता महाबळेश्वरच्या शेतकऱ्यांना अच्छे दिवस येणार आहेत.

काळ्या गव्हात मॅग्नेशिअम, आयर्न, झिंक अशा अन्नद्रव्यांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे शरिराची झिज लवकर भरुन येते. ताण तणाव, मधुमेह, लठ्ठ पणा यावरही हा गहू उपायकारक असतो. त्यामुळे या गव्हाला चांगली मागणी आहे.

थंड हवेचं ठिकाण आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक वर्ग महाबळेश्वरला येतो. आता काळ्या गव्हाच्या उत्पादनामुळे महाबळेश्वरसह इथल्या शेतकऱ्यांनाही नवीन ओळख मिळणार आहे. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live