VIDEO | आता प्रत्येक आठवड्याला गॅस सिलिंडरचे दर बदलणार!

साम टीव्ही
बुधवार, 23 डिसेंबर 2020

गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी. प्रत्येक आठवड्याला घरगुती गॅसचे दरही कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. 2 डिसेंबरला गॅस सिलिंडर जवळपास 50 रुपयांनी महागला. यानंतर दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 644 रुपयांपर्यंत पोहोचलीय.

सरकारी तेल कंपन्या आता दर आठवड्याला गॅस सिलिंडरच्या दराची समीक्षा करण्याची तयारी करतायत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक तेल कंपन्या यासाठी तयारीला लागल्या आहेत. आधीच कोरोनामुळे परिस्थिती चिघळत असताना आता सर्वसामान्यांना ही झळ सोसावी लागतेय.

सध्या गॅस सिलिंडरच्या दराची समीक्षा दर महिन्याला केली जाते. त्यानंतर किंमतीमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. तेल कंपन्यांना होत असलेलं नुकसान कमी करण्यासाठी हा प्लॅन तयार करण्यात आलाय. दर महिन्याच्या समीक्षेवेळी दरात घट केल्यानं जवळपास पूर्ण महिन्याचं नुकसान सहन करावं लागायचं. तर नव्या प्लॅननुसार कंपन्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जातेय. 

पाह, कसे असतील नवीन दर

संबंधित बातम्या

Saam TV Live