VIDEO | वास्तूशास्त्रामुळे उधळपट्टी

अमोल कविटकरसह, तुषार रुपनवर 
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

यादी मोठी आहे... सगळीच इथे सांगत नाही... तुम्हाला वाटलं असेल आम्ही तुम्हाला या बंगल्यांची किंमत सांगतोय... पण हा आहे केवळ डागडुजीचा खर्च... सूत्रांकडून जी माहिती समोर येतेय.. त्या माहितीनुसार मंत्री महोदयांनी वास्तूशास्राच्या अट्टाहासापायी तुमचे आमचे पैसे बंगल्यांवर उधळलेत... आता सत्तेतून आणि या बंगल्यांतून बाहेर पडलेल्या भाजपनेही या सरकारला धारेवर धरलंय.. 

 स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या.. फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या पक्षांचं सरकार... राज्यात आहे... आणि त्यांनी खरचं वास्तूशास्त्राच्या नादी लागून, ही उधळपट्टी केली असेल, तर करायचं काय? 

आता हे असले उद्योग लोक का करतात?

जोवर सत्ता आहे, तोवर बंगले आहेत... स्वतःचे बंगले असते.. कायमस्वरुपी मिळालेले असते.. तर हे असले उद्योग, स्वतःच्या पैशातून केलेले खपवताही आले असते... पण जनतेने भरलेल्या कराच्या पैशातून मंत्री महोदय असली फाजील उधळपट्टी करणार असतील.. तर ही आघाडी, महाविकास, महाराष्ट्राचा करु पाहतेय.. की आपल्या लाईफस्टाईलचा? याचं उत्तर त्यांनीच द्यायला हवंय..

WebTittle ::  VIDEO | Obsolete by architecture

संबंधित बातम्या

Saam TV Live