VIDEO | प्रत्येकाच्या खिशात येऊ शकतात एक कोटी रुपये...

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 3 मार्च 2020

आम्ही कुठल्या दामदुप्पट योजनेची जाहिरात करत नाही आहोत.... किंवा ही कुठल्या लॉटरीचीही जाहिरात नाहीय... तर ही आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अफलातून योजनेची माहिती... तुम्ही आता कोणत्याही दुकानात कितीही रुपयांची खरेदी करा, आणि मिळवा एक कोटी... फक्त तुम्हाला दुकानदाराकडून पक्कं बिल मागून घ्यावं लागेल. ते बिल एकदा का सरकारला पाठवलं की तुमच्या खिशात येऊ शकतात तब्बल एक कोटी रुपये...

कसे मिळवाल 1 कोटी रुपये

कितीही रुपयांची खरेदी केली की, पक्कं बिल मागावं लागणार, ते बिल सरकारला पाठवलं की लकी ड्रॉमधून तुमचं बिल टाकलं जाईल. त्यात तुमचं बिल निवडलं गेलं तर तुम्हाला एक कोटी रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी एक अॅप विकसित केलं जातंय. खेरदीनंतर घेतलेलं पक्कं बिल स्कॅन करून अॅपवर अपलोड करावं लागेल. कर बुडवणाऱ्यांकडून वसूल केलेल्या रकमेतून एक कोटी रुपये दिले जाणार.

कर बुडवेगिरीला चाप बसावा म्हणून सरकार हरतेऱ्हेने प्रयत्न करतंय. या योजनेतून लोकांना पक्कं बिल मागण्याची सवय लावण्याचाही सरकारचा हेतू आहे. एक कोटी रुपये मिळावेत म्हणून लोक पक्कं बिल मागतीलही, पण, दुकानदारांनी आढेवेढे घेऊ नये म्हणजे झालं. बाकी, या योजनेनं पक्कं बिल मागणाऱ्यांचं प्रमाण वाढेलच, देशाच्या तिजोरीत कराची रक्कम जमा होईलच आणि भाग्यवान ग्राहकाला एक कोटी मिळतील... तेव्हा मंडळी, आता खरेदी केल्यावर, पक्कं बिल मागायला विसरू नका... 

WebTittle :: VIDEO | One crore rupees can come in everyone's pocket ...

संबंधित बातम्या

Saam TV Live