VIDEO | चंद्रावर ऑक्सिजनचं तंत्रज्ञान विकसीत, पाहा काय आहे सत्य...

साम टीव्ही
मंगळवार, 1 डिसेंबर 2020
  • चंद्रावरील धुळीने तयार होणार ऑक्सिजन
  • युरोपियन अंतराळ संशोधन संस्थेचं संशोधन
  • चंद्रावरच्या धुळीनं जागवला आशावाद

 चंद्रावर मानवी वसाहत तयार करणं हे गेल्या अनेक वर्षांपासूनचं शास्त्रज्ञांचं स्वप्न आहे..मात्र मूळ मुद्दा आहे तो तिथल्या वातावरणाचा. याबाबत युरोपियन अंतराळ संशोधन संस्थेनं एक चांगली बातमी दिलीय. काय आहे ही खूशखबर तुम्हीच पाहा.

चंद्राबाबत तुम्हा आम्हाला नेहमीच कुतूहल वाटत आलंय. चंद्रावर मानवी पाऊल पडल्यानंतर तिथं वातावरण आहे का, तिथं मानवी वस्ती होऊ शकते का? याबाबत अनेक वर्षांपासून संशोधन सुरूंय. त्यातच आता युरोपियन अंतराळ संशोधन संस्थेनं चंद्रावरील धुळीच्या मदतीनं ऑक्सिजनची निर्मिती शक्य असल्याचा दावा केलाय. याशिवाय या प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या अतिरिक्त धातूचा वापर 3-डी प्रिंटिंगच्या माध्यमातून चंद्रावर अनेक उपकरणं तयार करण्यासाठी होईल असा विश्वासही या संस्थेनं व्यक्त केलाय. 

युरोपियन अंतराळ संशोधन संस्थेच्या संशोधनानुसार  संशोधकांचं एक पथक रेगोलिथ म्हणजेच चंद्रावरच्या धुळीबाबत संशोधन करतंय. या संशोधनानुसार चंद्रावरच्या धुळीत 45 टक्के ऑक्सिजनची मात्रा असते. याशिवाय या धुळीमध्ये लोह आणि टाईटेनियमसुद्धा असतं. या धातूंचा उपयोग दुसरी महत्वाची उपकरणं तयार करण्यासाठी होऊ शकतो. रेगोलिथ धुळीपासून ऑक्सिजनची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेला मेल्टन सॉल्ट हिट इलेक्ट्रोसिस असं नाव देण्यात आलंय.

याआधीदेखील चंद्रावर वातावरण असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे चंद्रावर ऑक्सिजन निर्मिती होत असल्यास दावा खरा ठरला तर विज्ञान तंत्रज्ञान युगातली ही सर्वात मोठी क्रांती ठरेल. 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live