VIDEO | पाणीपुरीत बाथरुमचं पाणी, पाहा नवी मुंबईतील हा धक्कादायक प्रकार

साम टीव्ही
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020
  • नवी मुंबईत बनवली जातेय डर्टी पाणीपुरी
  • पाणीपुरी बनवण्यासाठी बाथरूमच्या पाण्याचा वापर
  • ऐरोतील्या वेलकम स्वीट होममधील धक्कादायक प्रकार 
     

कोरोना संकटामुळे तुमचं आमचं आरोग्य धोक्यात आहे. अशातही काही जण जाणीपूर्वक लोकांच्या आरोग्याशी खेळतायेत. नवी मुंबईतल्या ऐरोलीत डर्टी पाणीपुरी बनवणाऱ्या एका  पाणीपुरी-विक्रेत्याला मनसेनं चांगलीच अद्दल घडवलीय. 

कोरोना रूग्णांची संख्या घटल्यानंतर आता कुठं लोक हळूहळू बाहेर पडू लागलेत. घाबरत घाबरत का होईना बाहेरच्या पदार्थांची चव चाखू लागलेत. पण हेच पदार्थ तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. कारण नवी मुंबईच्या ऐरोलीतल्या वेलकम स्वीट होम मध्ये पाणीपुरी बनवण्यासाठी चक्क बाथरूमचं पाणी वापरलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

या डर्टी पाणीपुरीचा सुगावा मनसैनिकांना लागताच त्यांनी खळ्ळं खट्याक स्टाईनं स्वीट होम मालकाला जाब विचारला. त्यावेळी आपण पाणीपुरी आणि ज्यूससाठी बाथरूमचं पाणी वापरत असल्याची कबुली मालकानं दिलीय. 

आधीच कोरोनामुळे लोक चिंतेत आहेत. त्यात स्वीट होमसारखे दुकानमालक घाणेरडं पाणी वापरून लोकांच्या आरोग्याशी खेळत असतील तर त्यांना अद्दल घडवायलाच हवी.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live