VIDEO | रस्त्यावर फिरतेय शीर नसलेली व्यक्ती ?

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

 

 

गर्दीच्या रस्त्यावरून शीर नसलेली व्यक्ती फिरतेय ती कोण आहे याचीच चर्चा होतेय...(प्ले व्हिज) बघा, ही व्यक्ती फक्त धड असलेलं शरीर घेऊन रस्त्यानं चालतेय...(प्ले व्हिज) पुण्यासारख्या गर्दीच्या शहरात ही व्यक्ती फिरत असल्याचा दावा सोशल मीडियावर केलाय...पण, खरंच ही व्यक्ती पुण्यात फिरतेय का...? अनेकजण हा प्रश्न विचारतायत...त्यामुळे याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला...

पुण्यात गल्ली गल्लीत गर्दी, रस्त्यावर ट्रॅफिक जॅम हे आपल्याला नित्याचं...पण अशातच अचानक या गर्दीत रस्त्यावर अचानक डोकं म्हणजेच शीर नसलेला माणूस दिसला तर चर्चा झाली असती...पण, अशी कोणतीही चर्चा नाही, बातमी नाही...मग ही शीर नसलेली व्यक्ती आहे तरी कोण...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...

 

या व्हिडिओत ही शीर नसलेली व्यक्ती ट्रॅफिकमधून वाट काढताना दिसतेय...अंगावर लेदरचं जॅकेट...थ्री फोर्थ पॅन्ट, पायात चपला आणि हातात लाल पिशवी...या पिशवीत या माणसाचं शीर तर नाही ना ? असाही प्रश्न अनेकांना पडला...मात्र, ट्राफिक आहे, गाड्या ये जा करतायत...कुणीही या माणसाला घाबरत नाहीये...म्हणून व्हिडीओ निरखून पाहिला...तर व्हिडीओत चीनी भाषेत लिहिलेले बोर्ड दिसून आले...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा... व्हिडिओ पुण्यातला असल्याचा दावा केला पण, पुण्यातला नसून चीनचा आहे. 

संबंधित व्यक्तीने शीर नाही हे दाखवण्यासाठी ट्रिक वापरलीय. सध्याच्या घडीला अनेकजण यूट्यूब चॅनेलचा वापर करतायत...आपल्या चॅनेलचे सबक्राईबर वाढावेत म्हणून काहीना काही ट्रिक वापरली जाते...अशाच प्रकारे ही ट्रिक वापरण्यात आली...आणि शीर नसलेली व्यक्ती रस्त्यावरून चालतेय असं दाखवण्यात आलं...पण, असं काहीही नसून, लोकांची दिशाभूल करण्यात आलीय...त्यामुळे असे व्हिडीओ पाहून विश्वास ठेवू नका...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही


संबंधित बातम्या

Saam TV Live