VIDEO | राज ठाकरे इज बॅक !

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई
बुधवार, 22 जानेवारी 2020

राज ठाकरे राजकीय पटलावर जोरदार कमबॅक करायच्या तयारीत आहेत, मनसेच्या महाअधिवेशनासाठी जोरदार वातावरणनिर्मिती सुरु झालीय. महाआधिवेशनाचाी तारीख जवळ आली असताना मनसेकडून दोन व्हिडिओ रिलीज करण्यात आलेत. या व्हिडिओंना स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आवाज दिलाय. छत्रपतींच्या लढाईसाठी प्रत्येक जातीचा माणूस लढत होता असा आशय एका व्हिडिओमध्ये आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सगळ्या पक्षांचा आदर्श हे छत्रपती होते असा आशय आहे. 

या दोन्ही व्हिडिओमध्ये  छत्रपती शिवाजी महाराज हे केंद्रस्थानी आहेत. 16 सेकंदाच्या या व्हिडीओत राज ठाकरेंचा आवाज ऐकू येतोय. राज्यात बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं. काँग्रेससोबत गेल्यानं शिवसेनाला आपली कडवी हिंदुत्ववादी भूमिका मवाळ करावी लागली होती. शिवसेनेची हीच स्पेस खेचण्यासाठी मनसेनं जोरदार प्रयत्न सुरु केलाय.

WebTittle :: VIDEO | Raj Thackeray is back!

संबंधित बातम्या

Saam TV Live