VIDEO | 26/11 हल्ल्यात कसाबला ओळखणाऱ्या रणरागिणीचं स्वप्न!

साम टीव्ही
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

कसाबला ओळखणाऱ्या देविकाला व्हायचंय पोलिस
पोलिस होऊन दहशतवाद्यांशी करायचाय सामना

 

12 वर्षांपूर्वी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. पण, हल्ल्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. कसाबने केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या अशाच एका धाडसी मुलीची कहाणी तुम्हाला सांगणार आहोत. तिला या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पोलिस व्हायचंय. कोण आहे ती धाडसी तरुणी. पाहुयात.

ही आहे देविका रोटावत. 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ओळखणारी बालसाक्षीदार. हल्ल्यात जखमी झालेल्या देविकाला हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पोलिस व्हायचंय. दहशतवाद्यांशी सामना करायचाय. हल्ल्याच्या वेळी देविका 10 वर्षांची होती...मात्र कोर्टात तिच्या साक्षीने सर्वांनाच चकित केले होतं. त्या वेळीही तिने कोर्टात कसाबकडे बोट दाखवून "याने माझ्यावर गोळी झाडली' असे ठामपणे सांगितले होतं. कुबड्यांच्या साह्याने ती कोर्टात आली तेव्हा देविका बोलेल का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र ती केवळ बोललीच नाही तर कसाबला आव्हान देत पायाला गोळी लागूनही मी उभी राहू शकते, हे तिने दाखवून दिलं. 

देविकाची ही धडाडी आता 12 वर्षांनंतरही कायम आहे. उजव्या पायात गोळ्या घुसल्यामुळं झालेल्या शस्त्रक्रिया, उपचार, घरची हलाखीची परिस्थिती न थांबणाऱ्या अडथळ्यांवर मात करत पोलिस होण्याचे तिचे स्वप्न आहे. पण, त्या दिवशी काय घडलं होतं ते पाहुयात.

  • हल्ल्याच्या दिवशी देविका वडील आणि भावासह  पुण्याला जाण्यासाठी सीएसएमटी स्टेशनवर होते
  • अतिरेकी अजमल कसाब आणि ईस्माईल खान यांनी अचानक एके 47 मधून गोळीबार केला 
  • देविकावर कसाबने गोळ्या डागल्या आणि तिचा पाय निकामी केला
  • शाळेतील तिची वर्षेही वाया गेली, मात्र तिचा निश्चय आणि ध्येय आता स्पष्ट आहे
  • दहशतवादाला ती बळी पडली तिचा सामना आता तिला पोलिस होऊन करायचाय. अजमल कसाबची साक्ष दिली तेव्हाच मुंबईतच शिकायचे आणि पोलिस दलात काम करायचं, हे पक्कं केलंय. दहशतवादाची भीती अजूनही आहे. पण आता शिकून पोलिस व्हायचं आणि देविकाला दहशतवाद्यांशी सामना करायचाय. देविकाचं हे स्वप्न पूर्ण होवो हीच इच्छा.


संबंधित बातम्या

Saam TV Live