रश्मिकाच्या अदांनी करोडो ह्रदय घायाळ, रश्मिका ठरलीय नॅशनल क्रश

साम टीव्ही 
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020
  • कर्नाटक क्रश ठरली 'नॅशनल क्रश'
  • गुगलवर रश्मिका मंदानाचा बोलबाला
  • रश्मिकानं जिंकली शेकडो प्रेक्षकांची मनं
     

सध्या गुगलवर नॅशनल क्रश असं सर्च केल्यास एकच नाव समोर येतंये. ते म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदाना. टॉलीवूडमध्ये धुमशान घालणाऱी रश्मिका शेकडो जणांच्या हृदयाची धडकन बनलीय. 

साऊथच्या सिनेविश्वात अगदी कमी कालावधीत स्वत:चा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री आहे रश्मिका मंदाना. आपल्या अभिनयांची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवारी रश्मिका नेटीझन्समध्येही कमालीची लोकप्रिय झालीय. आता तर ती नॅशनन क्रश म्हणून चर्चेत आलीय.  सर्च इंजिन गुगलवर 'नॅशनल क्रश ऑफ इंडिया' 2020 असं सर्च केल्यास रश्मिका मंदानाचं नाव समोर येतंय. त्यामुळे सोशल मिडियावर नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड करतोय.

साऊथ इंडस्ट्रीमध्ये अनुष्का शेट्टीपासून तमन्ना, समंथासारख्या एकापेक्षा एक सुंदर आणि हुशार अभिनेत्री आहेत. मात्र रश्मिकानं या सगळ्यांना मागे टाकलंय. 2017 मध्ये बँगलोर टाइम्सच्या 30 'मोस्ट डिझायरेबल वुमनच्या यादीत रश्मिका पहिल्या नंबरवर होती. किरिक पार्टी या सिनेमानं रश्मिकाच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. अवघ्या काही काळात रश्मिका कर्नाटक क्रश नावानं ओळखली जाऊ लागली. 

विजय देवरकोंडा आणि रश्मिका या दोघांच्या केमिस्ट्रीनं सजलेला हा सिनेमा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. इतकंच नाही तर येंटी येंटी गाण्यातील तिच्या सिग्नेचर स्टेप्सला सगळीकडे फॉलो केलं जाऊ लागलं. 

रश्मिकाच्या सौंदर्याच्या जादूनं तिचे चाहते पुरते घायाळ झालेत. लवकरच ती अल्लू अर्जूनसोबत पुष्पा या सिनेमात झळकणारंय. त्यामुळे या सिनेमात नॅशनल क्रशचा नवा लूक कसा असेल, याचीच उत्सुकता आता सगळ्यांना लागलीय. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live