VIDEO | शिवसेनेची अडचण करण्यासाठी भाजपची रणनिती, वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?

साम टिव्ही
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी भाजप सोडत नाहीए. अशातच महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून भाजप आता आक्रमक झालीय.

महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी भाजप सोडत नाहीए. अशातच महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून भाजप आता आक्रमक झालीय.

अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना पोलिस मारहाण प्रकरणी झालेल्या शिक्षेच्या मुद्द्यावर आता भाजप आक्रमक झालीय. ठाकूर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय.

काय आहे प्रकरण?
मार्च 2012 मध्ये यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ कर्तव्यावर असलेल्या पोलिसाशी हुज्जत घातली होती. याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करणे, तसंच शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध त्यांनी मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर त्यांच्या शिक्षेला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. 

पाहा व्हिडीओ-