VIDEO | भारत-रशियात करार झालेल्या रशियन लसीचेही दिसतायत दुष्परिणाम

साम टीव्ही
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020
 • रशियन लसीचे दिसतायत दुष्परिणाम
 • सातपैकी एका व्यक्तीवर होतोय परिणाम
 • रशियन लसीची भारतात चाचणी आवश्यक

भारत-रशियात कोरोना प्रतिबंधात्मक लसीसंबंधी करार झालाय. या करारानुसार भारताला कोट्यवधी डोस उपलब्ध होणार आहेत पण रशियन लसीविषयी एक धक्कादायक माहिती समोर येतेय. त्यामुळे भारत रशियन लसीसंबंधी सावधानता बाळगून आहे.

भारत आणि रशियात लसीवरनं करार झालाय, ज्यानुसार रशियन लसीचे कोट्यवधी डोस भारताला मिळणार आहेत. पण या लसीसंबंधी अनेक शंका उपस्थित करणारी बाब समोर आलीय. 

स्पुटनिक व्ही या रशियन लशीचा डोस घेतल्यानंतर दर सातपैकी एका स्वयंसेवकावर साइड इफेक्ट दिसतायंत. 

 • अश्कतपणा, स्नायुंमध्ये वेदना असे या साइड इफेक्टचे स्वरुप होते.
 • १४ टक्के लोकांनी अशक्तपणा आणि स्नायुंमध्ये वेदनेची तक्रार केली. 
 • २४ तासांसाठी अशक्तपणा, स्नायुंमध्ये वेदना हा त्रास जाणवला 
 • तसंच शरीराचं तपामान सुद्धा वाढलं  
 • ‘द मॉस्को टाइम्स’नं यासंबंधी वृत्त दिलंय. 
 • सध्या हजारो स्वयंसेवकांवर ‘स्पुटनिक व्ही’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु आहे.
 • रशियानं भारतातल्या डॉ. रेड्डी लॅबोरटरीज बरोबर करार केलाय. त्यानुसार कोट्यवधी डोस भारताला उपलब्ध होणार आहेत. पण या लसीचे साईडइफेक्ट्स पाहता या लसीची भारतीयांवर पुनर्चाचणी करण्याची आवश्यकता आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.
   


संबंधित बातम्या

Saam TV Live