VIDEO | गावठी कोंबडीच्या नावाने डुप्लिकेट कोंबड्यांची विक्री

साम टीव्ही
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

 

  • चिकन खाताय? तर ही बातमी नक्की बघा
  • तुमच्या ताटातलं चिकन गावठी कोंबडीचं नाही?
  • गावठी कोंबडीच्या नावाने ड्युप्लिकेट कोंबड्यांची विक्री

तुम्ही चिकन खात असाल तर ही बातमी काळजीपूर्वक पाहा. कारण, गावठी कोंबडीच्या नावाखाली बोगस कोंबड्या ग्राहकांच्या माथी मारल्या जातायत. ही सर्व फसवणूक महाराष्ट्रभर सुरूय.

कोंबड्या किलबलाटाचा आवाज वापरावा) चिकन आणायला आपण दुकानात गेलो की, हा आवाज आपल्या कानात घुमत राहतो. कोरोनाकाळात गावठी कोंबडी आरोग्याला चांगली असते म्हणून आपण गावठी कोंबडी मागतो. मग दुकानवाला रंगीबेरंगी पिसं असलेली कोंबडी कापायला घेतो.  पण मंडळी, तिथंच आपली फसवणूक झालेली असते. कारण फक्त पिसं रंगीबेरंगी असली म्हणून ती कोंबडी गावठी असेलच असं नाही. कारण, गावरान, आर आर आणि नगर-डी नावाच्या संकरित कोंबड्या गावठी म्हणून सर्रास विकल्या जातायत. 

दीडशे-दोनशे रुपयांच्या या संकरित कोंबड्या गावठी म्हणून आपल्या गळ्यात तब्बल चारशे-पाचशे रुपयांना मारल्या जातायत. म्हणून गावठी कोंबडी ओळखणं गरजेचं असतं.

संकरित कोंबडीचे पाय पिवळेधमक असतात आणि शेतात पाळलेल्या कोंबड्यांच्या पायांवर खवलं आणि काळसरपणा असतो, त्याचप्रमाणे गावठी कोंबडीची नखं अधिक धारदार असतात. गावठी कोंबड्यांची चोच लांब असते तर संकरित कोंबडीची चोच कापलेली असते. गावठी कोंबड्या काटक असतात, मात्र संकरित कोंबड्यांमध्ये मांस अधिक प्रमाणात असते.

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आणि गावठी कोंबडी आरोग्याला अधिक फायदेशीर असल्याने गावठी कोंबड्यांना मागणी वाढलीय. हेच हेरून चिकन विक्रेते ग्राहकांची लूट करतायत. त्यामुळे, ग्राहकांनी अधिक जागरूक राहायला हवंच पण, अशी फसवणूक करणाऱ्या चिकन विक्रेत्यांवर कारवाई व्हायलाच हवी.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live