VIDEO | औरंगाबाद की संभाजीनगर

 VIDEO | औरंगाबाद की संभाजीनगर

औरंगाबाद एक ऐतिहासिक शहर आणि इतिहासाचं वरदान मिळालेलं शहर. या शहराच्या अंगाखांद्यावर इतिहासनं आपल्या पाऊलखुणा सोडल्यात. 

निवडणुका आल्या की ऐतिहासिक औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी शिवसेना-भाजप सरसावत असतात. आता मनसेनंही या वादात उडी मारल्यानं हा मुद्दा आणखी पेटलाय.

औरंगजेब या क्रूर मुघल शासकाच्या नावावरुन औरंगाबाद असं नाव ठेवलं गेलंय. संभाजी महाराजांची  ज्या औरंगजेबानं हाल करुन हत्या केली, त्याच्या नावानं शहराचं नाव असण्याला आक्षेप घेण्यात आला. त्याऐवजी संभाजीनगर असं नामांतर व्हावं असा आग्रह हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना, भाजपनं धरला.


1988मध्ये औरंगाबादच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदाच संभाजीनगर नारा दिला होता, तेव्हापासून संभाजीनगर असाच उल्लेख शिवसेनेकडून केला जातो. 9 नोव्हेबर 1995 ला शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्यासाठीचा प्रस्ताव पालिकेनं पाठवला होता पण 2001 ला काँग्रेस आघाडी सरकारनं हा प्रस्ताव रद्द केला.
बाईट - दयानंद माने, निवासी संपादक, सकाळ ,औरंगाबाद 

संभाजीनगरचा मुद्दा शिवसेना भाजप युतीच्या चांगल्याच पथ्यावर पडलाय. औरंगाबाद महापालिकेत 30 वर्षांपासून युतीची सत्ता आहे, ३० वर्ष युतीचाच खासदार औरंगाबादच्या जागेवरुन सलग निवडून येतोय. एमआयएमच्या एंट्रीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची विरोधी पक्षाची जागा एमआयएमनं घेतलीय.

संभाजीनगरचा हा वाद सुरुही राहिल मात्र यातून पायाभूत सुविधांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत, ते सुटणार आहेत का याचं उत्तर कुणाजवळही नाही. त्यात आता पुन्हा मनसेची भर पडलीय, यातून कोण संभाजीनगर मुद्यावरून यशस्वी होईल हेच पहावं लागेल.

WebTittle :: VIDEO | Sambhajinagar of Aurangabad


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com