VIDEO | सोमवारपासुन शाळा पुन्हा गजबजणार, पण...

साम टीव्ही
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020
  • सोमवारपासून शाळा पुन्हा गजबजणार
  • मुलांचं स्वागत, सुरक्षेबाबत शाळांमध्ये लगबग
  • पालकांना धास्ती, सरकारच्याही कोलांटउड्या

येत्या सोमवारपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू होतायत.  पण, मुंबईत शाळा बंद आणि इतर ठिकाणी मात्र संभ्रम अशी काहीशी अवस्था झालीय.  तरीही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताची आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची लगबग उडालीय.  पाहूयात.

शाळांमध्ये साफसफाई, सॅनिटायझेशन सुरू असल्याचे व्हिज वापरावे  तब्बल सात ते आठ महिने विद्यार्थ्यांविना शांत असलेल्या शाळांमध्ये ही अशी लगबग सुरू झालीय. कारण, सोमवारपासून गजबजणार आहेत. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळेच, अनेक महिन्यांनंतर विद्यार्थी दिसणार असल्याने शिक्षकांनाही आनंद झालाय.

असं असलं तरी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जातेय. संपूर्ण शाळा, वर्गांचा कोपरा न कोपरा सॅनिटाईझ करण्यात येतोय.

एका दिवशी फक्त पन्नास टक्केच विद्यार्थी उपस्थित राहणार असून तीन ते चार तास शाळा भरणार आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आलेले नाही.
एकीकडे ही सगळी लगबग सुरू असताना पालक मात्र कोरोनाच्या भीतीने धास्तावलेले आहेत. तर दुसरीकडे सरकारी निर्णयाचा जांगडगुत्ता मात्र अजूनही सुरूच आहे. कारण, मुंबईतल्या शाळा 31 डिेसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेत, इतर ठिकाणी स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

म्हणजे, मुंबई वगळता इतर भागांत शाळा सुरू होणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. त्यामुळे नेमकं काय करायचं? याबाबत पालकांचा गोंधळ उडालाय. त्यामुळे, निर्णयाची योग्य वेळेत स्पष्टता होणं गरजेचं आहे.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live