VIDEO | 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील तो भाग वगळा
स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका अखेरच्या टप्प्यात आहेत. त्याचवेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मालिकेचे शेवटचे काही भाग दाखवण्यात येऊ नये अशी मागणी केलीय. मालिकेत सध्या संभाजी महाराजांना औरंगाजेबानं कैद केल्याचं दाखवण्यात येत असून यानंतरची दृश्यं पाहाणं मनाला पटणारं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या मालिकेतील असं चित्रीकरण रोखता येईल काय, याबद्दल निर्माते तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

तर कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी आम्ही घेतल्याचं मालिकेचे निर्माते दिग्दर्शक अमोल कोल्हे यांनी म्हंटलंय. मालिकेवरून कुणी राजकारण करू नये अशी भूमिकाही त्यांनी मांडलीय.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका राजकीय दबावामुळं बंद करण्यात येत आहे, अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं होतं. यावरुन अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं. त्यानंतर आता अर्जुन खोतकरांची नवी मागणी पुढे आल्यानं ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आलीय.
WebTittle :: VIDEO | Skip that part of the 'Self Defense Sambhaji' series