VIDEO | परीक्षाकाळात मशिदींवरच्या भोंग्यांचा विद्यार्थ्यांना त्रास?

VIDEO | परीक्षाकाळात मशिदींवरच्या भोंग्यांचा विद्यार्थ्यांना त्रास?


 दहावी, बारावीच्या परीक्षांचा काळ सध्या सुरूय. त्या पार्श्वभूमीवर नागपुरात युवा सेना आक्रमक झालीय. मशिदींवरच्या भोंग्यांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत असल्याचा आरोप युवा सेनेनं केलाय. तसं निवेदनच त्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिलंय. परीक्षाकाळात मशिदींवरचे भोंगे बंद करण्यासाठी युवा सेना लवकरच गृहमंत्र्यांचीही भेट घेणारेय.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनीही मशिदींवरच्या भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका मांडली होती.

सेनेचा मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा राज ठाकरेंनी हायजॅक केल्याच्या भीतीतून युवा सेनेनं हा मुद्दा उचललाय का अशीही चर्चा सुरूय.
खरंतर, मशिदींवरच्या भोंग्यांचा वाद काही नवा नाहीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीही हा मुद्दा पेटवला होता, आता सरकारमध्ये मंत्री असलेले युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे काय भूमिका घेतायत, हे पाहावं लागेल. दरम्यान, आताही यावरून उत्तरं-प्रत्युत्तरांच्या फैरी झडतायत.


आता विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि परीक्षांचं कारण देत मशिदींवरच्या भोंग्यांना विरोध होतोय. पण, विद्यार्थी हिंदू असो, नाहीतर मुस्लिम, मशिदींवरचे भोंगे असो, नाहीतर देवळांतला घंटानाद... सामाजिक शांतता, ध्वनिप्रदूषणाबद्दल प्रत्येकानं संवेदनशील असायलाच हवं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शिक्षणरुपी वाघिणीच्या दुधात भोंगे, घंटानादाचं राजकीय आणि धार्मिक मीठ पडू नये. इतकीच अपेक्षा.  

WebTittle :: VIDEO | Students suffer troubles at mosques during exam time?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com