VIDEO | 80 वर्षाच्या या सैराट आजीचा पोहतानाचा व्हिडिओ पाहाल तर पाहातच राहाल...

साम टीव्ही
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

 

  • 80 वर्षांची आर्ची सोशल मीडियावर व्हायरल
  • तरुणाईला लाजवेल असा आजीचा अंदाज

तुम्ही सैराट चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला विहिरीत पोहणारी आर्ची माहितीच असेल. अशाच एका 80 वर्षांच्या आर्चीचा विहिरीत पोहतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच हिट झालाय. कोण आहे ही 80 वर्षांची आर्ची चला पाहुयात.

डोक्यावर पदर कमरेला कास्टा खोचून. विहिरीतल्या पाण्याचा अंदाज घेत असलेली ही आज्जी. ही आजी विहिरीत पोहण्यासाठी तयार झालीय. आता बघा, ही आज्जी काय करतेय. या आज्जीनं विहिरीचा अंदाज घेतला. बघता बघता सैराटच्या आर्चीसारखी तिनं विहिरीत उडी मारली आणि थेट दुसऱ्या टोकाला पोहोचली. मग पुन्हा मागे फिरून विहिरीत मनसोक्त पोहून आजी बाहेर आली. तरुणाईलाही लाजवेल असा या आज्जीचा अंदाज. वयाच्या 80 व्या वर्षीही ही सैराट आजी विहिरीत पोहत असल्याचा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाला. 80 वर्षांची आज्जी म्हणून सोशल मीडियावर खूप कमेंट आल्या. ग आम्ही या आजीचा शोध घेतला.

सैराटच्या आर्चीची आठवण करून देणारी आज्जी सांगलीच्या जत तालुक्यातील राजोबाचीवाडीतील रहिवाशी. वय वर्षे 80. लक्ष्मीबाई रामू जानकर असं या आज्जीचे नाव. या आज्जीला वयाच्या ऐंशीव्या वर्षी पोहायला शिकायची इच्छा झाली आणि आज्जी चक्क पोहायला शिकण्यासाठी विहिरीत उतरली. आणि आजीनं पहिल्याच दिवशी मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटला. असं म्हणतात शिकायला वय लागत नाही. फक्त इच्छा असावी लागते. हे या आजीनं सिद्ध करून दाखवलं. 


संबंधित बातम्या

Saam TV Live