VIDEO | मोबाईल नेटवर्कसाठी उंच झाडांचा आसरा

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

हे आहेत हिंगोलीच्या ताकतोड्याचे ग्रामस्थ... या गावाला एक वेड लागलंय... हे गावकरी सारखे झाडांवर जाऊन बसतायत... त्यांना हे वेड दुसऱ्या तिसऱ्या कुणी लावलेलं नाही... तर हे वेड लावलंय मोबाईल कंपन्यांनी... त्याचं झालंय असं की, या गावात मोबाईलचं नेटवर्क पुरतं बोंबललंय... नेटवर्कची एखादीही कांडी मोबाईलवर दिसेना... त्यातच कुणाला तरी शोध लागला या झाडांचा... झाडांवर चढलं की नेटवर्कच्या पाचही कांड्या फुल्ल होतायत... मग गावकऱ्यांची मुर्कंड पडलीय... पोरं-टोरं, बायाबाप्ये झाडांवर जाऊन बसू लागलेत... नेटवर्कच्या पाच कांड्यांसाठी गावकरी पन्नास पन्नास फूट झाडांवर जाऊन बसू लागलेयत... जीव धोक्यात टाकून.

कुणाला बाळ झालं... चला झाडावर, डॉक्टरला फोन करायचाय... चला झाडावर, कुणाला यायला उशीर झाला...चला झाडावर... व्हॉट्सअॅपवर मेसेज करायचाय... चला झाडावर. अशी सगळी अवस्था या गावकऱ्यांची झालीय. अन्न-वस्त्र-निवाऱ्यासोबतच झाडही इथल्या लोकांची जीवनावश्यक वस्तू बनलीय. गावकऱ्यांना हजारदा तक्रारी केल्या पण मोबाईल कंपन्या ढिम्म त्या ढिम्मच.

फक्त जाहिरात करून डिजिटल इंडिया होत नसतो... जग फाईव-जीच्या मार्गावर आहे आणि आपल्याकडची ही ताकतोड्यासारखी गावं साध्या नेटवर्कसाठी झाडावर चढून बसतायत. याला दुर्दैव नाहीतर काय म्हणावं. झाडांना पानं, फुलं, फळं लागल्याचं आपण बघतोच, पण झाडांना नेटवर्क लागल्याचं ताकतोड्यात दिसतंय... धन्य ते प्रशासन... कृपा त्या मोबाईल कंपन्यांची... आणि आशीर्वाद त्या सर्व गावांना इंटरनेटनेने जोडण्याच्या बाता मारणाऱ्या सरकारचे...  दुसरं काय म्हणणार?
 
WebTittle :VIDEO | A tall tree trunk for a mobile network

संबंधित बातम्या

Saam TV Live