VIDEO | देशातील 3 हजार डॉक्टरांच्या अध्यापनावर या कारणामुळे बंदी

साम टीव्ही,
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

 

  • देशातील 3 हजार डॉक्टरांच्या अध्यापनावर बंदी
  • कागदोपत्री प्राध्यापक दाखवून डॉक्टरकी भोवली
  • महाराष्ट्र आणि कर्नाटकातील डॉक्टरांचा समावेश

देशभरातील 3 हजार आयुर्वेदिक डॉक्टरांच्या अध्यापनावर बंदी घलण्यात आलीय. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये फक्त कागदोपत्री नोंद करून इतर राज्यात डॉक्टरकी करणाऱ्या डॉक्टरांना चांगलाच दणका बसलाय. पाहूयात. 

 देशभरातील तब्बल 3 हजार डॉक्टरांच्या अध्यापनावर तब्बल 10 वर्षांची बंदी घालण्यात आलीय. अनेक डॉक्टरांनी परराज्यात प्राध्यापक असल्याचे बोगस पुरावे देऊन डॉक्टरकी सुरू ठेवली होती. त्यामुळे आयुष मंत्रालयाने ही कडक कारवाई केलीय.

महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकाने अन्यत्र कार्यरत राहू नये असा केंद्रीय परिषदेचा नियम आहे. मात्र नव्याने महाविद्यालयांत प्राध्यापकांची उपस्थिती फक्त कागदोपत्रीच असल्याचं उघड झालं. महत्त्वाचं म्हणजे, हे करताना या डॉक्टरांनी नोंदणी झालेल्या राज्याबाहेरच्या महाविलयात प्राध्यापक असल्याचे बोगस पुरावे दिलेत.

उपस्थितीचा गैरप्रकार थांबवण्यासाठी संबंधित प्राध्यापकांना अनेकदा नोटिसा दिल्या गेल्या, मात्र त्या नोटिशींना त्यांनी केराची टोपली दाखवली. म्हणून 3 हजार कागदोपत्री प्राध्यापकांच्या मास्तरकीवर 10 वर्षांची बंदी घालण्यात आलीय.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live