VIDEO | या रस्त्यावर आहेत जीवघेणे किडे, पाहा किड्यांमुळे झालेला हा भयंकर अपघात

साम टीव्ही
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

 

  • रस्त्यावरील किडे देतायत अपघातांना निमंत्रण
  • सांगलीच्या आयर्विन पुलावरचा प्रवास जीवघेणा
  • किड्यांमुळे झालेल्या अपघाताचा थरार बघा

आता बातमी सांगलीतल्या जीवघेण्या किड्यांची. सांगलीच्या आयर्विन पुलावर रात्रीच्या वेळी लाखो किड्यांचे थवेच्या थवे जमा होतायत.  त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागतेय.  मात्र हेच किडे कसे ठरलेत जीवघेणे?.

घोंगावणाऱ्या किड्यांचा आवाज यूट्यूबवरून घ्यावा) रात्रीच्या किर्रर्र अंधारात जे चित्र तुम्हाला दिसतंय ते पावसातलं नाहीय. किंवा हा वादळामुळे आलेला पाला-पाचोळाही नाहीय. तर हे आहेत किडे. हजारो-लाखोंच्या संख्येने हे किडे रस्त्यावर उतरलेयत. सांगलीच्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावर हे किड्यांचे थवेच्या थवे अवतरतायत. दिव्यांच्या प्रकाशाखाली हे किडे वेगाने घोंगावत असल्याचं चित्र रोज रात्री इथं दिसतं. या किड्यांपासून बचाव करण्यासाठी चारचाकी वाहनांच्या काचा बंद करता येतील, पण दुचाकींचं काय? दुचाकीस्वारांच्या डोळ्यांत सपकन हे किडे घुसतायत. त्यामुळे काय झालंय तुम्हीच पाहा.

किड्यांमुळे झालेल्या अपघातात हा तरूण बचावला खरा. पण इतरांचा धोका टळलेला नाहीय. कारण, सांगलीचा हा आयर्विन पूल तब्बल 70 फूट उंच आहे. असं घडू नये, पण या किड्यांमुळे एखादं वाहन पुलावरून कोसळलं तर, मोठी जीवितहानीची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे, प्रशासनाने वेळीच पावलं उचलून या किड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केलीय.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live