VIDEO | शिर्डीत दर्शनासाठी हे कपडे चालणार नाहीत, पाहा काय आहे नवीन नियम?

साम टीव्ही
बुधवार, 2 डिसेंबर 2020
 • शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला जाताय? 
 • तर तोकडे कपडे चालणार नाहीत !
 • साईंच्या दर्शनासाठी आता ड्रेसकोड
   

शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी जात असाल तर हा नवीन नियम पाहा. कारण, तोकडे कपडे घातले तर साईंच्या दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाहीये.दर्शनासाठी ड्रेसकोडची सक्ती कशाला. ? हे तुम्हीच पाहा.

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जात असाल तर आता तोकडे कपडे चालणार नाहीत.आणि तोकडे कपडे घालून साईंच्या दर्शनासाठी गेलात तर प्रवेश मिळणार नाही. अशा सूचनांचे फलकच साई संस्थानानं लावलेयत. हे फलक वाचा. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत हे फलक लावण्यात आलेयत.यावर काय लिहिलंय पाहा. 
आपण पवित्र स्थळी प्रवेश करीत असल्याने कृपया भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा परिधान करावी. म्हणजे तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेशास बंदी असेल असं या फलकाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. पण, हा निर्णय का घेतला गेलाय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 

 

 • साईंच्या दर्शनासाठी ड्रेसकोड
 • संस्थानचा कारभार सध्या तदर्थ समितीमार्फत पाहिला जात आहे
 • संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेऊन सूचना फलक लावण्यात आले
 • इतर देवस्थानांप्रमाणेच शिर्डीतही कपड्यासंबंधी निर्णय घ्यावा अशी मागणी भाविकांमधून होत होती
 • शिर्डीत दूरवरून भाविक येतात, अनेक जण पर्यटनाला यावे, तसे तोकड्या कपड्यांमध्ये येतात 
 • तोकडे कपड्यांमध्ये भाविक दर्शनासाठी जातात, ही गोष्ट खटकल्याने काही भाविकांची ही मागणी केली  ही भक्तांचीच मागणी असल्याचं साई संस्थानकडून सांगितलं जातंय. पण, या निर्णयाने अनेक भाविक नाराज झालेयत. ही सूचना आहे विनंती आहे की खरंच हा कडक नियम लागू करण्यात आलाय. असा संभ्रम भाविकांच्या मनात निर्माण झालाय. हा नियम भाविक पाळणार का.? हे पाहावं लागेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live