VIDEO | जिवंतपणी वाहिली मुलीला श्रद्धांजली

संभाजी थोरात साम टीव्ही कोल्हापूर
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

कोल्हापूरच्या कागल तालुक्यातलं हे गाव... या गावात एक बॅनर लागलंय..  ज्या बॅनरमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय... 

हाच आहे तो बॅनर, ज्यावर एका बापानं आपला संताप व्यक्त केलाय... आणि प्रेमविवाह करणाऱ्या मुलीला जाहीर सुनावलंय... या मुलीचे वडिल लिहितात, 

आज अखेर तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला... 
परंतु यापुढील तुझ्या आयुष्यात 
आनंद सुख देण्यास अमसर्थ ठरला
म्हणून तू सोडून गेलीस
हा काळादिवस पाहण्यासाठी म्हणून जिवंत असलेला
असा हा कमनशिबी बाप

बॅनरचं शीर्षक आहे, शोकाकुल आत्मक्लेश..

आणि बोध लिहिलाय... हे वाचून पळून जाणाऱ्या मुलींचं आत्मपरिवर्तन होईल.... 
महाराष्ट्राला झालंय काय? असा प्रश्न पडावा अशीच ही घटना... 

या बापानं भावना मांडल्या खऱ्या पण त्या सगळ्यांनाच रुचल्या नाहीत... काहींना मुद्दाच खटकला.... तर काहींना तो मांडण्याची, जगजाहीर करण्याची पद्धत खटकली... 

संबंधित बातम्या

Saam TV Live