VIDEO | टायगर मेमनचा विश्वासू साथीदार अटकेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मुनाफ माजीदच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. डोंगरीला वास्तव्यास असलेला माजीद मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा मुख्य सूत्रधार टायगर मेमन याचा विश्वासू साथीदार होता. मुनाफला गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केलीय.

डोंगरीला वास्तव्यास असलेला माजीद बॉम्बस्फोट मालिकेचा मुख्य सूत्रधार टायगर मेमन याचा विश्वासू साथीदार होता. १९९२मध्ये माजीदने मित्राकडून ७० हजार रुपये उसने घेऊन तीन नव्या स्कूटर विकत घेतल्या आणि मेमनच्या ताब्यात दिल्या. या स्कूटरमध्ये स्फोटके दडवून विविध ठिकाणी उभ्या केल्या गेल्या. झव्हेरी बाजार येथे झालेल्या शक्तिशाली स्फोटात माजीदने विकत घेतलेल्या एका स्कूटरचा समावेश होता. बॉम्बस्फोट मालिकेनंतर माजीद पसार झाला. तांदूळ आयात-निर्यातीच्या व्यवसायाआड तो भारतात  अमली पदार्थ, स्फोटकांची तस्करी करायचा.
मुनाफ माजीदची अटक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जातेय. आता मुनाफच्या अटकेनंतर अनेक महत्त्वाचे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
 
WebLink ::  VIDEO | A trusted partner of Tiger Memon arrested

संबंधित बातम्या

Saam TV Live