VIDEO | चीनला धडा शिवकवण्यासाठी भारताचं जमिनीखाली चक्रव्यूह

साम टीव्ही
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020
 • चीनला उत्तर देण्यासाठी जमिनीखाली चक्रव्यूह
 • लडाखमध्ये 'टनल डिफेन्स' तैनात 
 • टनलमुळे शत्रूच्या हल्ल्यापासून सैन्याचं होणार रक्षण

चीनला जशाच तसं उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे. चीनचीच रणनीती आखून सडेतोड उत्तर देण्याची तयारी भारतानं केलीय. काय आहे नक्की हा प्लान चला पाहुयात.

चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्करानं आता ड्रॅगनच्याच रणनीतीचा आधार घेतलाय. चीनचा प्रत्येक हल्ला परतवून लावण्यासाठी लडाखमध्ये टनल डिफेन्स तैनात करण्यात आलाय. चीननं अशाच प्रकारे टनल बनवून जपानविरुद्धाच्या युद्धात व्यूवनीती वापरली होती...त्यात चीनला चांगलं यशही मिळालं होतं. पण, आता चीनला जशाच तसं उत्तर देण्यासाठी भारताने चीनचीच रणनीती आखून हल्ला परतवून लावण्याचा प्लॅन आखलाय. 

HUME काँक्रिट बोगद्यांमुळे शत्रूच्या हल्ल्यापासून सैन्याचं रक्षण करता येतं. याशिवाय संकटसमयी हल्लादेखील करता येऊ शकतो त्यामुळे या HUME काँक्रिट पाईप्सचं वैशिष्ट्य काय आहे पाहुयात. 

काँक्रिट पाईप्सचं वैशिष्ट्य

 • Hume पाईप्सचा व्यास 6 ते 8 फूट इतका असतो
 • पाईप्समधून जवान एका भागातून दुसऱ्या भागात जाऊ शकतात
 • शत्रूच्या गोळीबारापासून जवानांचा बचाव होतो
 • बाहेरचं वातावरण अतिशय थंड असलं तरीही पाईप गरम ठेवले जाऊ शकतात
 • हिमवृष्टी झाली किंवा वादळ आलं तर जवान या पाईप्समध्ये आसरा घेऊ शकतात
 • या Hume काँक्रिट बोगद्यांमुळे शत्रूच्या हल्ल्यापासून सैन्याचं रक्षण करता येणार आहे. इतकंच नव्हे तर संकटसमयी हल्लादेखील करता येऊ शकतो. त्यामुळं भारताशी पंगा घेताना चीननं सावधगिरी बाळगायला हवी. नाहीतर भारताकडून चीनला जशाच तसं उत्तर मिळेल.
   


संबंधित बातम्या

Saam TV Live