VIDEO | माकड आणि कुत्रीची अनोखी मैत्री !

ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

 

 

...माकडाचं पिल्लं भूकेनं व्याकूळ झालं होतं...त्याला चालताही येत नसल्याने कुत्रीनं त्याला दया दाखवली... माकडाच्या पिल्लाला पाठीवर बसून कुत्री खाऊच्या शोधात होती... बघा, या माकडाच्या पिल्लाला पाठीवर बसवून कुत्री काय खायला मिळतंय का हे शोधतेय...अखेर एका व्यक्तीनं या भूकेलेल्या माकडाच्या पिल्लाला पाव खायला दिला. पाव दिसताच माकडाच्या पिल्लानं उडी मारली आणि पाव घेऊन पुन्हा कुत्रीच्या पाठीवर बसलं. पाव मिळताच हे माकडाचं पिल्लू जाम खूश झालं.आणि पाव खाऊ लागलं...प्राणी, पक्षी बघा, कसे एकमेकांना मदत करतात...या पिल्लाला भूक लागली म्हणून काहीतरी खायला मिळावं म्हणून कुत्रीनं पाठीवरून फिरवलं... 

हा व्हिडीओ आता व्हायरल होतोय.कुत्री आणि माकडाच्या पिल्लाची अनोखी मैत्री पाहून लोकांनाही आश्चर्य वाटतंय...हा सगळा प्रकार कोल्हापुरात पाहायला मिळाल्याचं बोललं जातंय...या व्हिडीओतून प्राणी एकमेकांना दयामाया दाखवतात हे दिसून आलं...त्यामुळं माणसांनीही संकटकाळी एकमेकांना मदत करायला हवी...

WebTittle ::  VIDEO | The unique friendship of a monkey and a dog!


संबंधित बातम्या

Saam TV Live