VIDEO | समुद्रात ही निळाई आली कुठून?पाहा एलईडी लाईट्स लावल्याचा हा नजारा

साम टीव्ही
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

 

 • कुट्ट काळोखात समुद्रात निळाई !
 • समुद्रात एलईडी लाईट्स लावल्याचा नजारा
 • समुद्रात निळाई पसरण्यामागचं रहस्य काय ?

काळ्या कुट्ट समुद्रात निळाई दिसत होती. समुद्रात जणू काही एलईडी लाईट्सच लावल्यासारखं वाटत होतं. पण, समुद्रात लाईट्ससारखी निळाई कशी काय दिसत होती. या निळाईचं रहस्य काय हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मग काय समोर आलं पाहा.

सिंधुदुर्गातल्या देवगड समुद्रात निळाईची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरूय. रात्रीच्या कुट्ट अंधारात समुद्रात निळा प्रकाश चकाकताना दिसला. त्यामुळे हा निळा प्रकाश कसला. ? समुद्रात एलईडी लाईट्स लावल्या की काय. ? असे अनेक प्रश्न निर्माण झालेयत. पण, ही दृष्यं दिसताना मनमोहक दिसत होती. त्यामुळं या निळाई समुद्राची सर्वत्र चर्चा होतेय. देवगड समुद्र किनाऱ्यावर अशा निळ्या लाटा पाहायला मिळाल्या. या निळ्या लाटा कशा काय तयार झाल्या. हा प्रश्न सगळ्यांनाच पडल्यानं. नक्की हा प्रकार काय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

 • बाईट-रवींद्र पवार, सागरी जीव अभ्यासक
 • समुद्राचं पाणी निळं का झालं पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून...
 • समुद्रातल्या निळाईचं रहस्य काय?
 • 'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स' या सूक्ष्म जीवाचा समुद्राच्या लाटांच्या पाण्याने घर्षण होऊन निळीशार चादर पसरते
 • 'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स' हा जीव सागरी परिसंस्थेला घातक आहे
 • हे जीव माशांचे अन्न असणाऱ्या 'फायटोप्लॅन्कटन्स' आणि 'डिऍटॉम्स' मोठ्या प्रमाणात खातात
 • समुद्रातला हा निळा प्रकाश जलचरांसाठी घातक असतो
 • समुद्रातलं प्रदूषण वाढलंय याचंही हे दिशादर्शक आहे
 • समुद्रात कार्बनडायऑक्साईडचं प्रमाण वाढतं, त्यावेळी अशा प्रकारचा निळा प्रकार समुद्रावर दिसतो. आपल्याला दिसायला जरी चांगलं वाटत असलं तरी जलचरांसाठी ही निळाई घातक आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live