VIDEO | दोन हजारांच्या नोटा बंद होण्याच्या मार्गावर?

 VIDEO | दोन हजारांच्या नोटा बंद होण्याच्या मार्गावर?

 दोन हजारांच्या नोटा बाजारातून गायब होण्याच्या मार्गावर आहेत. आणि हे काम करणारेत बँका...  कारण इंडियन बँकेनंतर इतरही बँका दोन हजारांच्या नोटा एटीएममध्ये टाकणं बंद करणारेयत... त्यासाठी एटीएममध्ये तांत्रिक बदल करण्याची तयारी बँकांनी सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलंय. एटीएममध्ये नोटांच्या आकारानुसार कॅसेट असतात, त्यातील दोन हजारांच्या नोटांसाठीचं कॅसेट काढलं जाणारेय. याचाच अर्थ बँका बाजारातून दोन हजारांच्या नोटा गायब करण्याच्या तयारीत असल्याचं समजलं जातंय.


एटीएममधून आलेल्या दोन हजारांच्या नोटा सुट्ट्या करण्यासाठी लोक बँकेतच येतायत आणि त्याचा बँकांना त्रास होतोय. असं म्हणत बँका एटीएममध्ये दोन हजारांच्या नोटा टाकणं बंद करण्याच्या विचारात आहेत. दुसरीकडे दोन हजारांची नोट सुट्टी करण्यासाठी पायपीट करावी लागतेय अशी तक्रार सामान्य ग्राहक करतायत.

सरकारच दोन हजारांच्या नोटा बंद करणारअसल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आता बँकांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सरकारच अप्रत्यक्षपणे दोन हजारांची नोट बंद करतंय, अशीही टीका होतेय. ते काहीही असो, मात्र या निर्णयामुळे ग्राहकांना त्रास होऊ नये आणि नोटाबंदीत झाली तशी लोकांची परवड पुन्हा होऊ नये, हीच सामान्य लोकांची भावनाय.

WebTittle ::  VIDEO | On the way to closing two thousand notes?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com