प्रेयसीवर अतिप्रसंग; फेसबुकवर व्हायरल केला व्हिडीओ !

संजय तुमराम
शनिवार, 5 जून 2021

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एका युवकाने आपल्याच प्रेयसीवर केलेल्या अतिप्रसंगाचे व्हिडीओ फेसबूकवर टाकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर Chandrapur जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एका युवकाने आपल्याच प्रेयसीवर केलेल्या अतिप्रसंगाचे Rape व्हिडीओ फेसबुकवर Facebook टाकल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. प्रेयसीवर अतिप्रसंग करून युवकाने फेक फेसबूक आयडी तयार करत हा व्हिडीओ सार्वत्रिक केला. The video went viral on Facebook after raping his girlfriend

या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, आरोपी युवक पीडित मुलीचा जातीवरून सतत अपमान करत असल्याने तिने लग्नाला नकार दिला होता. आरोपीने यानंतर स्वतःच्या हाताची नस चाकूने कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपी या मुलीला असाच धाक दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करत असे. २७ मे रोजी त्याने शहरालगत कारवा जंगलात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. 

एकाच वेळी लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह आठ कर्मचारी निलंबीत !

त्यानंतर एक जून रोजी याच कारवा जंगलात तिला पुन्हा नेले आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. धक्कादायक बाब म्हणजे त्याने तिचे बळजबरीने व्हिडीओ आणि फोटो देखील काढले. मुलगी लग्नाला नकार देतेय याचा राग आरोपीच्या डोक्यात होता. म्हणून तिच्या वाढदिवशी म्हणजे ४ जून रोजी गिफ्ट देत असल्याचे सांगत आरोपीने चक्क अत्याचाराचे फोटो-व्हीडिओ बनावट फेसबुक खाते तयार करत त्यावर अपलोड केले.

हे देखील पहा - 

मर्यादा ओलांडत मुलीला टॅग देखील केले. व्हिडीओ -फोटो बघताच मुलगी आणि तिचे कुटुंबीय हादरले. त्यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या तक्रारीवरून सायबर तपास करत पोलिसांनी पुरावे गोळा करण्यात आले. विकृत मानसिकतेचा आरोपी सन्मुखसिंग बुंदेल याला अटक करण्यात आली असून, पोलीस या धक्कादायक घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live