VIDEO | कोरोनाच्या चिखलात स्कूल व्हँनची चाकं रुतली, स्कुल व्हँन काकांची उपासमार

साम टीव्ही
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

 

  • कोरोनाच्या चिखलात स्कूल व्हॅनची चाकं रुतली
  • स्कूल व्हॅनच्या ड्रायव्हर काकांची उपासमार
  • शाळा सुरू होणार, पण स्कूल व्हॅनचं काय होणार?

अनलॉकमध्ये अनेक उद्योग, व्यवसाय आणि सेवा सुरू झाल्यात. सोमवारपासून शाळाही सुरू होतायत.  पण स्कूल व्हॅनबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.  त्यामुळे आधीच सात ते आठ महिने हाताला काम नसल्याने संकटात असलेल्या स्कूल व्हॅनचालक काकांचे डोळे सरकारकडे लागलेयत. पाहूयात.

 कोरोनाच्या संकटात शाळा बंद होत्या.  लॉकडाऊनमध्ये शाळा बंद, वाहतूकही बंद होती. आता अनलॉकमध्ये सगळ्याच उद्योगांची चाकं फिरू लागलीयत. मात्र तरीही स्कूल व्हॅन आणि स्कूल बद आजही जागच्या जागी उभ्या आहेत. त्यामुळे स्कूल व्हॅन चालवून पोट भरणाऱ्या ड्रायव्हर काकांची उपासमार सुरू आहे.

सोमवारपासून शाळा सुरू होतायत, मात्र स्कूल व्हॅन आणि स्कूल बसबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे, स्कूल बसचालक सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेयत. शाळांसाठी जशी नियमावली जाहीर केलीय, तशीच नियमावली करून स्कूल बस आणि व्हॅन सुरू करण्याची मागणी होतेय.

कोरोनाच्या काळात अनेकांच्या पोटाला मोठा खड्डा पडला. स्कूल बस आणि व्हॅनचालकांनाही हाताला काम नसल्याने हताशपणे दिवस ढकलावे लागत आहेत. घर कसं चालवायचं असा प्रश्न त्यांच्यापुढे स्पीड ब्रेकरसारखा उभा राहिलाय. त्यामुळे, कोरोनाच्या चिखलात रुतलेली बस आणि व्हॅनची चाकं सुरू करून, ड्रायव्हर काकांच्या संसाराच्या गाड्यालाही गती देण्यासाठी पावलं उचलायला हवीत.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live