VIDEO | बड्या कंपन्यांच्या मधात कोण करतंय भेसळ ? मधाच्या नावाखाली साखरेच्या पाकाची विक्री

साम टीव्ही 
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

 

  • मधाच्या नावाखाली साखरेच्या पाकाची विक्री
  • सेंटर फॉर सायन्स एन्व्हायर्नमेंटचा दावा
  • बड्या कंपन्यांच्या मधात कोण करतंय भेसळ?

भारतीयांच्या आहारात मधाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पण आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या मधात भेसळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा प्रकार नेमका काय आहे पाहूयात एक विशेष रिपोर्ट.

चांगल्या आरोग्यासाठी दर्जेदार मधाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अनेक बड्या कंपन्या मधाच्या नावाखाली चक्क साखरेचा पाक विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटने केलेल्या तपासातून ही बाब उघड झालीय. 

मध शुद्धतेचं प्रमाण तपासणासाठी CSE ने न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स म्हणजेच NMR चाचणी केली. या चाचणींतर्गत तब्बल 13 छोट्या मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासण्यात आले. या कंपन्यांच्या मधात 77 टक्क्यांपर्यंत भेसळ असल्याचं दिसून आलं. मधाच्या 22 मापदंडांपैकी काही कंपन्यांनी अवघे 5 मापदंड पूर्ण केलेत.
मात्र या बड्या कंपन्यांनी NMR चाचणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. आपली प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव असल्याचाही या कंपन्यांचा आरोप आहे. आता यावर संबंधित शासकीय यंत्रणा नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं असेल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live