VIDEO | योगींच्या आमंत्रितांमध्ये मराठी उद्योजक का नाही ?

साम टीव्ही.
गुरुवार, 3 डिसेंबर 2020
  • योगी आदित्यनाथांना मराठीचं वावडं का?
  • योगींच्या आमंत्रितांमध्ये मराठी उद्योजक का नाही?

योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मुंबई दौऱ्यादरम्यान एकाही मराठी उद्योजकाची भेट घेतली नाही. त्यामुळे योगींच्या भूमिकेवरून मराठी उद्योजकांमध्ये काहीशी नाराजी आहे. 

त्तर प्रदेशात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी योगी आदित्यनाथांनी महाराष्ट्रातल्या काही मान्यवर उद्योगपतींशी चर्चा केलीय. पण चर्चेसाठी बोलवलेल्या या आमंत्रितांमध्ये योगींनी एकाही मराठी उद्योजकाला आमंत्रण न दिल्याने नाराजी व्यक्त होतेय. 

योगींनी चर्चा केलेल्या मान्यवरांमध्ये टाटा सन्सचे एन चंद्रशेखरन, लार्सन अॅन्ड टुब्रोचे एस.एन सुब्रमण्यम, अदानी डिफेन्सचे आशिष राजवंश, अशोक लेलॅन्डचे रजत गुप्ता, तसंच हिरानंदानी ग्रुपचे निरंजन हिरानंदानी, भारत फोर्सचे बाबा कल्याणी, आणि कॅपिटल सर्व्हिसेसचे विकास जैन यांच्यासह सेंट्रम कॅपिटल्सचे जसपाल बिंद्रा आणि केकेआर लिमिटेडचे संजय नायर अशा बड्या उद्योजकांचा समावेश आहे. 

मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासात मराठी माणसाच्या जोडीने अनेक अमराठी उद्योजकांचंही मोठं योगदान आहे. मात्र या उद्योजकांना महाराष्ट्राने दिलेली संधीसुद्धा लाख मोलाची आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या या त्यागाचा योग्य तो सन्मान योगी आदित्यनाथांनी ठेवावा हीच माफक अपेक्षा. 


संबंधित बातम्या

Saam TV Live