VIDEO | एटीएममधून पैसे काढणं आता खिसा कापणार?

VIDEO |   एटीएममधून पैसे काढणं आता खिसा कापणार?


 तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल तर ही बातमी नक्की बघा... कारण येत्या काही दिवसांत एटीएममधून पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क भरावं लागण्याची शक्यताय. एटीएम ऑपरेटर असोसिएशनने तशी मागणी रिझर्व्ह बँकेकडे केलीय. असोसिएशनच्या मागणीनंतर रिझर्व्ह बँकेने समिती स्थापन केलीय. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थापन झालेली समिती वाढीव शुल्क आकारण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती मिळतेय. रिझर्व्ह बँकही हा अहवाल मिळाल्यावर एटीएम व्यवहारांना वाढीव शुल्क आकारण्याच्या मानसिकतेत आहे. तसं झालं तर, एटीएममधून पैसे काढल्यावर तुमचा खिसा कापला जाणारेय.

हा निर्णय अजून झालेला नसला तरी, त्यावर सामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय. मात्र, एटीएम ऑपरेटर्सच्या म्हणण्यानुसार एटीएम शुल्क कमी असल्याने त्यांना मोठ्या तोट्याला सामोरं जावं लागतंय. एटीएम ऑपरेटर्सचा तोटा भरून काढण्यासाठी सामान्य मानसांना भुर्दंड बसण्याची शक्यता निर्माण झालीय.


मुळात एटीएम ही प्रत्येकासाठी जीवनावश्यक गोष्ट बनून गेलीय. रोजच्या जगण्यात एटीएम परवलीची गोष्ट बनलीय. असं असताना शुल्क वाढवल्यास प्रत्येकालाच त्याचा फटका बसणारेय. रिझर्व्ह बँकेने शुल्क वाढवणं टाळता येतंय का हे बघावं किंवा शुल्क आकारलंच तर ते बकासुरी नसावं, अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करतायत.

WebTittle :: VIDEO | Will withdrawing money from ATMs cut the pockets now?


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com