तुमच्या कामाची वेळ 12 तास होणार? वाचा काय आहे नवीन प्रस्ताव

साम टीव्ही
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

तुमच्या कामाची वेळ 12 तास होणार?
12 तासांहून अधिक काम केल्यास ओव्हरटाईम भत्ता?
केंद्रीय कामगार मंत्रालयाचा महत्त्वाचा प्रस्ताव

आता बातमी तुमच्या आमच्या कामाची. 8 तासांची ड्युटी हा शब्द परवलीचा आणि सवयीचा झालाय.  पण आता हीच 8 तासांची ड्युटी आता 12 तासांची होण्याची शक्यताय. केंद्रीय कामगार मंत्रालयाने तसा प्रस्ताव सादर केलाय. पाहूयात सविस्तर रिपोर्टमधून.

कोणत्याही ऑफिसात किंवा कंपनीत काम करताना 8 तासांची ड्युटी हा परवलीचा शब्द बनून गेलाय. मात्र हीच 8 तासांची ड्युटी आता 12 तास होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने तसा प्रस्ताव सादर केलाय. तो मंजूर झाला तर, ड्युटीचे तास हे 8 तासांवरून 12 तास होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कामगार मंत्रालयाने 12 तास काम करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या 12 तासांमध्ये ब्रेकचाही समावेश असणार आहे. कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 12 तासांच्या ड्युटीचा प्रस्ताव भारतातील परिस्थिती पाहून ठरविण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, कामगाराला ओव्हरटाइमच्या भत्त्याच्या माध्यमातून अधिक कमवण्याची सुविधा मिळेल. म्हणजेच, 8 तासांहून अधिक काम करणाऱ्या सर्व कामागारांना ओव्हरटाइम मिळू शकेल

आपल्या देशात 8 तासांची नोकरी हा प्रघात पडून शतकं उलटली... त्यामुळे धंदा म्हणजे 24 तासांची नोकरी आणि नोकरी म्हणजे 8 तासांचा धंदा अशी म्हण प्रचलित झाली, मात्र त्यात आता नोकरी म्हणजे 12 तासांचा धंदा असा बदल होऊ शकतो... पण हे सर्व होताना कामगारांच्या आरोग्यावर आणि वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ नये, याची काळजी घ्यावीच लागेल.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live