वर्षपुर्ती एका फसलेल्या बंडाची! कथा अडीच दिवसाच्या सरकारची

वर्षपुर्ती एका फसलेल्या बंडाची!  कथा अडीच दिवसाच्या सरकारची

बरोब्बर एका वर्षापुर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला होता. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी वर्षभरापुर्वी याच दिवशी सत्ताग्रहणाची शपथ घेतली होती. 
कसा होता हा धाडसी डाव? पाहूयात एक रिपोर्ट.

23 नोव्हेंबर 2019. ही तारीख आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भूकंप घडवणारी. आजच्याच दिवशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रितपणे सरकार स्थापन केलं होतं. मात्र हे सरकार अवघं अडीच दिवसही टीकू शकलं नाही. आणि फडणवीसांना नाईलाजास्तव राजीमाना द्यावा लागला होता. 

या पुढे पहाटे शपथ घेणार नाही, आता या पुढे तुम्हाला योग्य वेळी शपथविधी दिसेल,' असं म्हणतानाच त्यांनी अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात,
खरंतर हा फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा या शपथविधीनंतर रंगली होती. 

भाजपकडे 105 आमदारांचं पाठबळ होतं. आणि बहुमताची मॅजिक फिगर गाठण्यासाठी त्यांना अवघ्या 40 आमदारांची गरज होती. 15 अपक्षांनीही भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे किमान 38 आमदार येतील असं गणित मांडत फडणवीसांनी हा धाडसी डाव खेळला. 

पण शरद पवारांच्या चाणाक्ष चालींनी हा डाव उधळून लावला. आणि अखेर भाजपची ती घोडचूक ठरली. नेटीझन्सनीही ट्वीटरसारख्या सोशल फ्लॅटफॉर्मवर आज जोरदार शेरेबाजी केलीय. एकूणच काय तर फडणवीसांचा हा फसलेला मास्टरस्ट्रोक पुढची अनेक वर्ष त्यांची पाठ सोडणार नाही हे नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com