शिवसैनिक भाजपचा प्रचार करणार नाहीत 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

पुणे  - शहरातील एकही मतदारसंघ न मिळाल्याने संतापलेल्या शिवसैनिकांचा राग अद्यापही शांत झालेला नाही. सैनिकांच्या या रागाला बुधवारी संपर्क नेते बाळा कदम यांना सामोरे जावे लागले. ‘हे शहर शिवसेना संपविण्याचे कारस्थान आहे,’ असा आरोप करीत भाजपच्या प्रचाराला न जाण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तर, पक्षाचे कसब्यातील नगरसेवक विशाल धनवडे यांनी थेट ‘मी उद्या अर्ज भरीत आहे, तुम्हीसुद्धा या,’ अशी विनंती बैठकीत संपर्क नेत्यांनाच केली.

एकही मतदारसंघ शिवसेनेला मिळाला नाही, त्यामुळे पक्षात मोठी अस्वस्थता आहे. मुंबई येथे ‘मातोश्री’ला भेट दिल्यानंतर दाद न मिळाल्यामुळे शिवसैनिकांचा राग अनावर झाला. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे धनवडे यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेऊन थेट प्रचारालाच सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर कदम यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह वीस पदाधिकारी उपस्थित होते. 

‘तुम्हाला माहिती होते, तरीदेखील तुम्ही आम्हाला तयारी का करायला सांगितली? तुम्ही आम्हाला फसविले. तुमच्या या धोरणामुळे पक्षाचे वाटोळे झाले,’ अशा शब्दांत शिवसैनिकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी  करून दिली.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी कोथरूड येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते शशिकांत सुतार वगळता एकही शिवसैनिक हजर नव्हता.

Web Title: Vidhan Sabha 2019 Shiv sainik refused to campaign for BJP

संबंधित बातम्या

Saam TV Live