भाजपात नाराजी उफाळली 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

गुहागर - गुहागर मतदारसंघ भाजपला न मिळाल्याने तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्यासह पाच पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या कार्यकर्त्यांना समजाविण्याचा प्रयत्न डॉ. नातूंसह अन्य पदाधिकाऱ्यांनी केला. तरीही सहा पदाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. 

सुरेश सावंत यांच्याबरोबर अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष आसिफ दळवी, शक्ती केंद्रप्रमुख संदीप गोरिवले व संदीप कोंडविलकर, भाजयुमोचे उपाध्यक्ष संतोष जोशी, अनुसूचित जाती जमाती सेलचे तालुकाध्यक्ष पराग सावंत या पदाधिकाऱ्यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. 
नातूंप्रमाणेच तालुका सरचिटणीस नीलेश सुर्वे यांच्यासह सचिन ओक यांनीही या पदाधिकाऱ्यांना समजावले. मात्र पक्षाकडून आपल्या कामाची दखल घेतली जात नसल्याने हे सहाजण राजीनाम्यावर ठाम राहिले आहेत. 
तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्या पाठविलेल्या राजीनाम्यात लिहिले आहे की, पक्षाने वेळोवेळी दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडली. केंद्र आणि राज्यात सरकारने घेतलेले लोककल्याणकारी निर्णय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्याचे काम अहोरात्र केले. पक्षवाढीकरता धडपडलो. गुहागर विधानसभा क्षेत्रातील 321 बूथ प्रमुखांचा मेळावा 100 टक्के उपस्थित पार पाडला. याच मेळाव्यात आमदार प्रसाद लाड आणि आपण गुहागर विधानसभा नातू साहेबांच्या रुपाने खेचून आणू असा शब्द दिलात. परंतु दुर्दैवाने गुहागरची जागा पक्षाने युतीचे कारण सांगत शिवसेनेला दिली. त्यामुळे आम्ही कार्यकर्ते नाराज आहोत. म्हणून मी माझ्याकडे असलेला पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देत आहे. 

Web Title: Vidhan Sabha 2019 unwillingness in Guhagar BJP
 
संबंधित बातम्या

Saam TV Live