विजय मल्ल्याने त्यांचे केले अभिनंदन...

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

लंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्विटरवरून सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये काँग्रेसने यश मिळवले आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याबरोबरच ज्योतिरादित्य सिंधिया यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. राजस्थानमध्ये सचिन पायलट मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. या पार्श्वभूमीवर विजय मल्ल्या यांचे ट्विट बुचकळ्यात टाकणारे आहे.

दरम्यान, विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणाला अखेर वेस्टमिनिस्टर न्यायालयाने मंजुरी दिली आहे. यावर ब्रिटनच्या गृहमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब होणे बाकी असून, त्यानंतर मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. भारताने मल्ल्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांमध्ये कोणतीही खोट नसल्याचे मुख्य न्यायाधीश एम्मा अर्बथनॉट यांनी स्पष्ट करत त्याच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदील दाखवला. मल्ल्याला इतक्‍या मोठ्या प्रमाणात कर्ज कसे दिले, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करतानाच अर्बथनॉट यांनी ही बाब गंभीर असल्याचे नमूद केले. तत्पूर्वी मल्ल्याला दिलेला जामीन न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायालयाने पुढील कारवाईसाठी हे प्रकरण ब्रिटनचे गृहमंत्री साजिद जावेद यांच्याकडे पाठविले असून, ते याबाबतचा अंतिम निर्णय घेतील. दरम्यान, या निर्णयाविरोधात 14 दिवसांच्या आत ब्रिटनमधील उच्च न्यायालयाकडे दाद मागण्याचा पर्याय मल्ल्यासाठी खुला आहे. या निर्णयाचे सीबीआय व सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) स्वागत केले आहे.

मल्ल्याला भारतात आणल्यानंतर मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील 12 क्रमांकाच्या कोठडीत ठेवले जाणार असून, तेथील पूर्वस्थिती आतापर्यंत प्रत्यार्पणात अडथळा ठरली होती. मात्र, आता तिथे आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचे पुरावेही मध्यंतरी न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यावरून मल्ल्याच्या जीवितास तेथे कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा वेस्टमिनिस्टर न्यायालयाने दिला.

Web Title: vijay mallya congratulates sachin pilot and jyotiraditya scindia

संबंधित बातम्या

Saam TV Live