प्लिज ऐका, मी पूर्ण कर्ज फेडण्यास तयार- विजय मल्या

प्लिज ऐका, मी पूर्ण कर्ज फेडण्यास तयार- विजय मल्या

नवी दिल्ली- भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्याने कर्ज फेडण्याची तयारी दाखवली आहे. मी 100 टक्के कर्ज फेडण्यास तयार आहे, पण व्याजाची रक्कम देऊ शकत नाही, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे. भारतातील प्रसारमाध्यमे आणि नेते हे पक्षपाती असल्याचा आरोपही त्याने केला आहे. प्रसारमाध्यमं आणि नेतेमंडळी माझ्यावर बँकांचे कर्ज बुडवून पसार झाल्याचा आरोप करतात. पण त्यात तथ्य नाही. मला निष्पक्ष वागणूक का दिली जात नाही, असेही त्याने म्हटले आहे.
कर्जात बुडण्याचे कारण सांगताना मल्याने म्हटले आहे की, एअरलाइन्स कंपनीला विमानाचे इंधन महागल्याचा फटका बसला. यामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान झाले आणि बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम हे नुकसान भरुन काढण्यात खर्च झाली. मी बँकांना 100 टक्के मुद्दल फेडायला तयार आहे. कृपया बँकांनी माझी ऑफर स्वीकारावी, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे. यामुळे बँकांचेही नुकसान होणार नाही, असे त्याने सांगितले.
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपीचं प्रत्यार्पण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विजय मल्ल्याने ट्विटरवरुन बँकांच्या थकीत कर्जावर भाष्य केले आहे. विजय मल्ल्या म्हणतो, किंगफिशर मद्य क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून गेल्या तीन दशकापासून कंपनी भारतात व्यवसाय करत आहे. आम्ही अनेक राज्यांना हजारो कोटी रुपये दिले आहे. किंगफिशर एअरलाइन्सनेही अनेक राज्यांना मदत केली होती. पण दुर्दैवाने किंगफिशर एअरलाइन्सचे नुकसान झाले. तरीही मी बँकांना कर्जाच्या मुद्दलीची परतफेड करायला तयार असल्याचे स्पष्टीकरण विजय मल्याने दिले आहे.

Web Title: Vijay Mallya Offers To Repay 100% To Banks Says Please Take It

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com