...तेव्हा अडीच लाखांपैकी दीड लाख विद्यार्थी निघाले होते पॉझिटिव्ह

Vijay Vadettiwar Explains Resons Behind Postponement of MPSC Exams
Vijay Vadettiwar Explains Resons Behind Postponement of MPSC Exams

नागपूर : गेल्या १४ मार्चला आपण एमपीएससीची MPSC परीक्षा घेतली. कारण त्यासाठी राज्यभर Maharashtra ठिकठिकाणी आंदोलने झाली. रास्ता रोको करण्यात आले. त्यामुळे ती घ्यावी लागली. तेव्हा अडीच लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी दीड लाख विद्यार्थी पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे आता ११ एप्रिलला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. Vijay Vadettiwar Explains Why Government Postponed MPSC Exams

११ एप्रिलला होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेला ३ लाख ८१ हजार विद्यार्थी बसणार होते. यासंदर्भात अनेकांची मते भिन्न होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाचे नेते आणि मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat, जयंत पाटील Jayant Patil  यांच्यासोबत झुम मिटिंग घेतली आणि सर्वांची मते जाणून घेतली. मोठ्या शहरांमध्ये एका खोलीत चार ते पाच विद्यार्थी असतात. त्यातील एकही विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळला तर बाकीच्या विद्यार्थ्यांना गृहविलगीकरणात Home Isolation जावे लागते. त्यांना घराबाहेर पडता येत नाही आणि सध्याचा कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता पुन्हा ती स्थिती उद्भवू नये, असा चर्चेचा सूर निघाला. म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. 

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येत्या रविवारी (ता. ११ एप्रील) होणारी एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही परिक्षा पुन्हा केव्हा होणार, हे मात्र सांगण्यात आलेले नाही. या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय घेण्यात आला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांचीही उपस्थिती होती.

येत्या ११ एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) गट-ब ची परीक्षा होणार होती. मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj thakrey) यांनी राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी केली होती. यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thakrey यांना फोन केला होता.  गेल्याच महिन्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यातील Pune विद्यार्थ्यांनी रस्त्यांवर उतरून जोरदार आंदोलन केले होते. पण विशेष म्हणजे आता विद्यार्थ्यांनी याबाबाबत आपली भूमिका बदललेली आहे. Vijay Vadettiwar Explains Why Government Postponed MPSC Exams

कोरोनाचा वाढता धोका पाहता परीक्षेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी अनेक  विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लागण झालेली आहे. यापैकी एका विद्यार्थ्यांचा मृत्यूही झाला आहे. परिक्षेच्या कारणामुळे सर्व विद्यार्थी एकत्र आले तर कोरोना पसरण्याचे प्रमाण अधिक वाढू शकते. पुण्यात या परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे या तरुणाचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com