१५ जूनपर्यंत मुंबईकरांना लोकल प्रवास नाहीच! 

vijay-vadettivar
vijay-vadettivar

कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे Virus आपले प्राण गमावले आहेत.कोरोनानं Corona शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर थैमान घातल्याने, सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे.  Vijay Wadettiwar Hints at easing Curbs from 1ST June

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने Government कडक निर्बंध लावले आहेत. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुंगांची संख्या कमी होत असल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे आता लाॅकडाऊन शिथील करावे ही मागणी होत आहे. पुढील पाच दिवस परिस्थिती बघून त्यानंतर निर्णय घेवू अशी माहित विजय वड्डेटीवार Vijay Wadettiewar यांनी दिली आहे. १४ जिल्हा रेड झोन मध्ये आहेत त्यामुळे त्या जिल्हयात सगळे निर्बंध शिथील करणे शक्य नाही. हाॅटस्पाॅट असलेल्या जागी कडक नियम राहीले पाहिजेत अशी भूमिका  विजय वड्डेटीवार यांनी मांडली आहे. 

हे देखील पहा -

लोकल प्रवासा बाबत सरसकट पर्याय उपलब्ध करून दिलेा तर रूग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ जूनपर्यंत लोकल प्रवास सुरू करता येणार नाही अशी माहिती विजय वड्डेटीवार यांनी दिली. Vijay Wadettiwar Hints at easing Curbs from 1ST June

पुढे विजय वड्डेटीवार म्हणाले की, शेतीचे पंचनामे थोडे उशीर होत आहे कारण नुकसान जास्त प्रमाणात झाले आहे. शेतीचे पंचनामे पुर्ण झाले की मदतीचा निकष कॅबिनेट बैठकीत घेवू. निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खूप ठिकाणीवीज गेली होती तर २९ हजार घरांची पडझड झाली आहे. बागायती पंचनामे सुरू असून चार पाच दिवसात हे पंचनामे पूर्ण होतील आणि सर्वांना समाधान होईल, अशी मदत केली जाईल.

दरम्यान, वड्डेटीवार यांनी यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात उपोषण  करावे, याआधी केंद्र सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप मिळाली नाही. टीकाटीपण्णी करण्यापेक्षा कोकणातील लोकांना मदत करावी अशी मागणीही वडेट्टीवार त्यांनी केली.Vijay Wadettiwar Hints at easing Curbs from 1ST June

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com