दिलासादायक! लातूर जिल्हयातील 'हे' गाव कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर  

दीपक क्षीरसागर
बुधवार, 28 एप्रिल 2021

बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात धार्मिक सप्ताह झाला,आणि गावात कोरोनाची साथ पसरली. पाहाता पाहाता गावातील १८८ लोकांना त्याची लागण झाली. गावातील तीन लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाले

लातूर : बाराशे लोकसंख्या असलेल्या लिंबाळावाडी गावात Village धार्मिक सप्ताह झाला,आणि गावात कोरोनाची Corona साथ पसरली. पाहाता पाहाता गावातील १८८ लोकांना कोरोनाची लागण झाली. गावातील तीन लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.  मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गावात धार्मिक सप्ताह आयोजित करण्यात आले होते.  गावातील अबालवृद्ध त्या सप्ताहास हजर होते. येथूनच गावात कोरोनाचा शिरकाव सुरु झाला. The village of Limbalawadi is being liberated from Corona

एप्रिल April महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह Positive आढळून आला. आणि पाहता-पाहता ही संख्या शंभरच्या पार गेली. प्रशासन हादरून गेले. गावात तपासणी करण्यास सुरुवात केली, तर पॉझिटिव्ह लोकांची संख्या १८८ झाली. गावात सर्वत्र प्रतिबंधित क्षेत्र वाढली. प्रशासनाने गावबंदचे निर्देश दिले.  गावातच राहून १५० पेक्षा जास्त लोक ठीक झाले, काही लोकांना चाकुरला ठेवण्यात आले होते.

आता गाव  कोरोनातून सावरले आहे. मात्र, यात ३ लोकांचा बळी गेला आहे. गणपती गाडे (वय ९५), रुक्मिणीबाई साखरे (वय ९०), शांताबाई बिराजदार (वय ५५) अशी मृताची Dead नावे आहेत. गावात आता भयाण शांतता असते. लहान थोर सगळेच मास्क Mask शिवाय फिरत नाहीत. सध्या गावात कोरोनाची माहिती देणाऱ्या फलकांनी गाव भरले आहे. वृद्ध लोक तोंडाला मास्क लावल्याशिवाय बाहेर येत नाहीत. कुणीही कोणाच्या घरी जात नाही. The village of Limbalawadi is being liberated from Corona

आता संपूर्ण गाव कोरोनामुक्त होत आहे. आता गावातील अबाल वृद्ध सर्वच जण नियमाचे पालन करत आहेत. सगळी लोक सुरक्षित अंतर ठेवून एकमेकांना बोलत असतात. ही जागृती होण्यासाठी या गावाला बरेच मूल्य द्यावे लागले आहे, असे मूल्य देऊन नियम आणि निर्बंध पाळायचे का ? असा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आता आलेली आहे.

Edited By- Digambar Jadhav

 

संबंधित बातम्या

Saam TV Live