कोरोना मुक्तीचा भोसी पॅटर्न : हाॅटस्पाॅट ठरलेला कोरोना झाला हद्दपार

संतोष जोशी
शनिवार, 15 मे 2021

कोरोना आजाराचे गांभिर्य गावकऱ्यांना कळले आणि नांदेड जिल्ह्य़ातील भोसी गावानं एकजुटी दाखवत कोरोनाला धोबीपछाड केलं. कोरोना पॉझिटिव्ह झालेले सर्व लोक एकत्रच विलगीकरणात जाऊन त्यांनी कोरोनाला स्वतःपासून दूर केले. त्यामुळे या पॅटर्न चे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

नांदेड:  कोरोना Corona आजाराचे गांभिर्य गावकऱ्यांना कळले आणि नांदेड Nanded जिल्ह्यातील भोसी Bhosi Gaon गावानं एकजुटी दाखवत कोरोनाला धोबीपछाड केलं. कोरोना पॉझिटिव्ह झालेले सर्व लोक एकत्रच विलगीकरणात जाऊन त्यांनी कोरोनाला स्वतःपासून दूर केले. त्यामुळे या पॅटर्नचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कोरोनाला हद्दपार करून आणि महाराष्ट्रासाठी Maharashtra  अदर्श ठरले कोरोना मुक्तीचे भोसी पॅटर्न. The villagers of Bhosi gaon defeated Corona

नेमके काय केले गावकऱ्यांनी ? 

कोरोना व्हायरसच्या भितीमुळे आणि अज्ञान पणामुळे ग्रामीण भागात Rural area कोरोनाचा मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला. नांदेड जिल्ह्यातील सहा हजार लोकसंख्या असलेल्या भोसी गावात इथं एका लग्न समारंभातून कोरोनाचा फैलाव झाला. आणि तब्बल 119 जणांना कोरोनाची लागण झाली. मात्र, गावकऱ्यांनी एकजुट दाखवत कोरोनाला हरविण्याचा निश्चय केला. आणि एक व्यक्तीनेही गावात प्रवेश न करता स्वतःला शेतात Farm विलगीकरण करुन घेतले. 14 दिवस औषधोपचार घेऊन  119 जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली.  

हे देखील पहा -

कोरोनाचा रुग्ण अढळताच गावात 20 दिवसाचं लाॅकडाऊन Lockdown पाळण्यात आला. तसेच कोरोना बाधित रुग्णांमधील भिती घालवून गावकरी आणि प्रशासनाच्या मदतीनं कोरोना मुक्त गावं करण्यात यश मिळाले. The villagers of Bhosi gaon defeated Corona

कोरोना वाढतोय, आणि लस तुटवड्यामुळे लसीकरण सुद्धा बंद !

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने Second Wave ग्रामीण भागात घातलेलं थैमान आणि त्यावर नांदेड जिल्ह्यातील भोसी गावाने राबविलेला भोसी पॅटर्न. हा राज्यातच नव्हे तर देशासाठी आदर्श ठरणारा आहे.

Edited By- Sanika Gade
 

 

संबंधित बातम्या

Saam TV Live