धक्कादायक: गावच्या पोलीस पाटील कुटुंबावरच गावकऱ्यांचा बहिष्कार

akola family
akola family

अकोला - जिल्ह्यातील पातुर Patur तालुक्यातल्या सोनूना या गावात  पोलीस  Police पाटील कुटूंबावरच बहिष्कार boycot टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनूना हे गाव अतिशय दुर्गम आणि आदिवासी पाड्यात असून गावकऱ्यांनी Villager गावात दबदबा असलेल्या काही जणांच्या दबावाखाली येत पोलीस पाटलावर बहिष्कार टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस पाटील यांच्या कुटुंबाला  किराणा Grocery देऊ नये, दळण दळण्यास मनाई तसेच सार्वजनिक हातपंपवर पाणी Water भरण्यास मनाई करण्यात येत आहे. Villagers boycott Patil police family

धक्कादायक म्हणजे गावातील कुणी बहिष्कृत पोलिस पाटलाच्या कुटुंबाशी बोलल्यास दहा रुपये दंड असा निर्णय देखील घेण्यात आल्याची माहिती आहे. भारतीय संविधानानुसार सर्वांना जीवन जगण्याचा अधिकार आहे. माणूस हा समाजशील प्राणी असून कायद्यानुसार कोणावरही बहिष्कार घालणे गुन्हा आहे. असे असताना देखील सोनूना गावात गेल्या ३० वर्षापासुन पोलीस पाटील पदावर कार्यरत असलेल्या रमेश नारायण कदम यांच्यासह त्यांच्या परिवारातील त्यांच्या पत्नी शशिकला रमेश कदम, आई गंगुबाई नारायण कदम, मुलगी गोकूळा कदम, रीना रमेश कदम आणि मुलगा प्रमोद रमेश कदम या सर्वांवर गावातील काही समाज धुरीणांच्या दबावाखाली येत पोलीस पाटील यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे.

हे देखील पहा -

गेल्या पंधरा दिवसांपासून गावातील कुणीही पोलीस पाटलांच्या परिवाराशी बोलत नाही त्याबरोबरच गावातील सार्वजनिक स्थळावरून पिण्याचे पाणी भरू दिले जात नाही, गावातील दुकानदार आणि पीठ गिरणी वाल्याला दळन देऊ नये असा तुघलकी फतवा गावातील काही समाज धुरीणांनी काढला आहे आणि जर गावातील कोणी पोलिस पाटलाच्या कुटुंबा सोबत बोलले तर दहा रुपये दंड आकारला जाईल असा फतवा देखील काढला आहे. दरम्यान यासंदर्भात पोलीस पाटील असलेले रमेश कदम यांनी चान्नी  पोलीस स्टेशनला तीन वेळा फिर्याद दिली मात्र पोलिसांनी कुठलीच दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.  त्यामुळे जगावे की मरावे असा प्रश्न कदम कुटुंबीयांवर ओढवला आहे.  Villagers boycott Patil police family

बहिष्कार टाकण्याचे काय आहे नेमके कारण- 

पोलीस पाटील रमेश कदम यांच्या शेतात सामाजिक सभागृह बांधून त्याला मंदिराचे स्वरूप देण्याचा निर्णय सत्ताधारी राजकीय पक्षाच्या गावातील पुढारीपण करणाऱ्या चार जणांनी घेतला तेव्हा माझ्या शेतात बांधकाम करण्यापूर्वी माझी परवानगी का घेतली नाही या कारणांवरून कदम परिवाराला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. गावात राजकीय पुढारी पण करणारे संबंधित चार लोक एवढ्यावरच थांबले नाही तर राजकीय शक्तीचा गैरवापर करीत गावकऱ्यांना कदम परिवारावर बहिष्कार टाकण्यास बाध्य केले असल्याचे समजते. Villagers boycott Patil police family

मात्र पोलीस पाटलाला न्याय मिळत नसल्यामुळे त्यांनी पातुर तहसील आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागण्याचे ठरवले मात्र गेल्या दोन महिन्यापासून पोलीस प्रशासनाने सदर गंभीर प्रकाराची दखलच घेतली नसल्याचे समोर येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com