टांगा गावातील गावकर्‍यांचे कोरोना महामारीच्या मुक्तीसाठी ग्रामदेवतेला साकडे...

अभिजीत घोरमारे
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

जिल्हा प्रशासन कोरोना थैमान रोखण्यासाठी अपयशी ठरल्यामुळे, आता भंडारा जिल्हा वासियानी कोरोनाचे संकट टाळण्यासाठी चक्क देवाकडे धाव घेतल्याचे चित्र समोर येत आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी नंतर आता तालुक्यातील टांगा या ठिकाणी वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, कोरोनाला रोखण्यासाठी टांगा गावातील गावकऱ्यांनी चक्क देवीच्या मंदिरात महायज्ञाचे आयोजन करत ग्रामदेवतेला साकडे घातले आहे

भंडारा : जिल्हा प्रशासन कोरोनाचा Corona थैमान रोखण्यासाठी अपयशी ठरल्यामुळे, आता भंडारा Bhandara जिल्हा वासियानी कोरोनाचे संकट टाळण्यासाठी चक्क देवाकडे धाव घेतल्याचे चित्र समोर येत आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी Mohadi नंतर आता तालुक्यातील टांगा Tanga या ठिकाणी वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, कोरोनाला रोखण्यासाठी टांगा गावातील गावकऱ्यांनी चक्क देवीच्या मंदिरात महायज्ञाचे आयोजन करत ग्रामदेवतेला साकडे घातले आहे. The villagers of Tangi prayed to God to get rid of the Corona epidemic

देशात कोरोना वाढत असल्याने तो कमी व्हावा व सगळे लोक लवकरात लवकर बरे व्हावे, तसेच टांगा येथे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गावातून कोरोना हद्दपार व्हावे, याकरीता संपूर्ण गावातील लोकांनी देवीच्या मंदिरात सामूहिक आरती व  माताच्या मंदिरात मातेचे अभिषेक आणि हळदी कुंकवाचे कार्यक्रम करत सामूहिक हवन कार्य केले आहे. ग्रामदेवतेला कोरोनाच्या महामारीपासून वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी साकडे घातले आहे. 

यावेळी गावच्या सीमेवर border सुद्धा पूजा करण्यात आली आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन टांगा ग्रामवासियांकडून करण्यात आले होते. भंडारा जिल्ह्यात कोरोनाने थैमान घालता असून जिल्ह्यात ११ हजार ०६३ कोरोनाबाधित रुग्णांवर  उपचार  सुरु आहे. तर ८१७ लोकांचा मृत्यु Dead झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कोरोनाचे थैमान रोखू न शकल्याने "देवच आपला वाली" या उक्तिप्रमाणे जिल्ह्यातील लोक देवाकडे साकडे घालत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live