आरक्षण न मिळण्याला अशोक चव्हाणच जबाबदार : विनायक मेटे

विनोद जिरे
बुधवार, 5 मे 2021

मराठा समाजाचा तळतळाट यांना लागल्याशिवाय राहणार नाही. यामुळं अशोक चव्हाणानी एक मिनिटं सुद्दा पदावर राहू नये.अशी सडकून टीका आमदार विनायक मेटे यांनी केली

बीड : मराठा आरक्षणाचा निकाल आज लागला.जे आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांच्या प्रयत्नांमुळ मिळालं होतं.ते या आघाडी सरकारच्या मूर्खपणामुळं, नालायक पणामुळं, या सरकारने सर्वोच न्यायालयामध्ये योग्य बाजू न मांडल्यामुळं रद्द झालंय. हा मराठा समाजासाठी काळा दिवस आहे, अशी सडकून टीका आमदार विनायक मेटे यांनी सरकारवर केली असून आता मराठा तरुणांनीच आंदोलन हातामध्ये घ्यावं, असं आवाहन देखील मेटेंनी जाहीर कार्यक्रमातून केलंय. Vinayak Mete Blamed Ashok Chavan about Maratha Reservation Cancellation

हे देखिल पहा- 

ते बीडमध्ये जिजाऊ कोविड सेंटरच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ''हा अत्यंत अन्नामध्ये मीठ कालवण्याचा प्रकार या सरकारने केला आहे. अशोक चव्हाण याला सर्वस्वी जबाबदार आहेत,  म्हणून चव्हाणांनी एक मिनिट सुद्धा या पदावर राहता कामा नये. ४२ लोकांनी बलिदान देऊन आणि करोडो लोकांनी रस्त्यावर येऊन, जे मिळवलं, ते यांनी मातीत घालवलं. सगळ्यांचं जीवन उद्धवस्त करून हे मात्र मस्त एसीमध्ये बसून पैसे कमवायचे आणि बाकी सगळं गमवायच्या मागे लागले आहेत,'' 

महाविकास आघाडीने घोर फसवणूक केली - गिरीश महाजन

मराठा समाजाचा तळतळाट यांना लागल्याशिवाय राहणार नाही. यामुळं अशोक चव्हाणानी एक मिनिटं सुद्दा पदावर राहू नये.अशी सडकून टीका आमदार विनायक मेटे यांनी केली. Vinayak Mete Blamed Ashok Chavan about Maratha Reservation Cancellation

तर आता मराठा समाजातील तरुणांनी हे आंदोलन हातामध्ये घेतलं पाहिजे, असं आवाहन देखील विनायक मेटे यांनी सार्वजनिक कार्यक्रमातून मराठा समाजातील तरुणांना केलंय. यामुळं आता मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन उग्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live