नांदेडमध्ये पोलिसांवर हल्ला; होला मोहल्ला कार्यक्रमादरम्यान हिंसाचार

संतोष जोशी
मंगळवार, 30 मार्च 2021

काही उत्साही तरुणांनी प्रशासनाचे आदेश धुडकावत काल सायंकाळी पोलिसांनी केलेली बॅरिकेंटींग तोडत होला मोहल्ला कार्यक्रम केला. जमावाने पोलिसांवर तलवारीने हल्ला चढवला आणि पोलिसांच्या वाहनांची प्रचंड तोडफोड केली.

नांदेड: नांदेड (Nanded) मध्ये वाढत्या कोरोनामुळे(Corona) शिख बांधवांचा होला मोहल्ला कार्यक्रम प्रशासनाने रद्द केला होता. मात्र, काही तरुणांनी प्रशासनाचे आदेश धुडकावत सायंकाळी पोलिसांनी केलेली बॅरिकेंडिंग तोडत होला मोहल्ला कार्यक्रम केला. यावेळी उत्साही जमावाने पोलिसांवर तलवारीने हल्ला (Sword attack)  चढवला आणि पोलिसांच्या वाहनांची प्रचंड तोडफोड केली.Violence in Nanded over Program at Gurudwara

जखमी झालेल्या पोलिसांमध्ये पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांचा अंगरक्षक दिनेश पांडे यांच्यासह आणखी पाच पोलिस गंभीर जखमी झालेत. घटनास्थळावर तरुणांनाचा जमाव (Crowd) जास्त आणि पोलिस संख्या कमी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जमावाने पोलिस अधिक्षक, अतिरिक्त पोलिस अधिक्षकाच्या गाड्यांसह दगडफेक (Stone throwing)  करून गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर करून टाकला. 

गुरुद्वाराने अावाहन करुनही उत्साही तरुणांनी होला मोहल्ला कार्यक्रम केला. जमावाने खाजगी वाहनांचीही प्रचंड नासधुस केली. दरम्यान या प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नसून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी दिली.. Violence in Nanded over Program at Gurudwara

जिल्हा प्रशासनाची (District Administration) परवानगी नसताना पारंपारिक असलेल्या शिख (Sikh) बांधवाना होला मोहल्ला मिरवणूक काढली आणि थेट पोलिसांवर तलवारीने (Swords) हल्ला चढवला, यात तरुणांनी केलेल्या जीवघेण्या कृतीतून  पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे  बचावले गेले. शिवाय पोलिस (Police) अधीक्षकांच्या गाडीसह आठ गाड्यांची तोडफोड ही करण्यात आली होती. या प्रकरणात आता पर्यंत पोलिसांनी काही हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पाचही जखमी पोलिसांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे.  

पोलिसांवरील झालेलया हल्ल्यात प्रत्यक्षदर्शी आणि सिसीटीव्ही च्या आधारे 60 हल्लेखोरांची ओळख पटली आहे. आता पर्यंत 17 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आणि जवळपास 350 ते 400 जणांवर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी दिली. दरम्यान, परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती ही शेवाळे यांच्याकडून देण्यात आली आहे. आज सकाळ पासून पुन्हा पोलिसांकडून हि मोहिम तीव्र करण्यात आली आहे. Violence in Nanded over Program at Gurudwara

Edited by- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live