Viral | चोराला पळवून लावणाऱ्या मशिनचं रहस्य काय ?

संदीप चव्हाण
बुधवार, 4 मार्च 2020

चोर गाड्या पळवत असल्याने चोरांची चांगलीच दहशत निर्माण झाली होती.चोर सापडतही नव्हते.म्हणून चोरांना पकडण्यासाठी एका व्यक्तीने हटके युक्ती केली.त्यामुळे चोर चोरी करण्याचं धाडस करत नाही.असं काय केलंय त्या व्यक्तीने वाचा सविस्तर.

चोरीच्या घटना वाढू लागल्याने एका व्यक्तीने चोरांना पकडण्यासाठी हटके युक्ती केलीय.एक चोर चोरी करण्यासाठी या ठिकाणी येत होता.पण, चोराला माहित नव्हतं की आपल्यावर कुणाची तरी नजर आहे.चोर सायकलवरून या गाडीजवळ येतो त्यावेळी अचानक गाडीतून पाण्याचा फवारा उडतो.चोराच्या अंगावर पाण्याचा फवारा उडाला आणि चोर आल्या पावली परत पळून जातो.गाडीमध्ये ठेवलेल्या पावरफुल जेटने अंगावर फवारा उडतो.चोराला वाटतं की कुणीतरी या गाडीतून पाणी मारतंय.म्हणूनच चोरानं इथून पळ काढला.

हे ही वाचा- होळीच्या रंगात कोरोना व्हायरस ?

गाड्यांची चोऱ्या होतात याच्या वारंवार बातम्या येत होत्या.त्यामुळं सीसीटीव्ही लावला, पण सीसीटीव्ही असूनही चोर चोरी करतात म्हणूनच या व्यक्तीनं वेगळी युक्ती केली.गाडीमध्येच सेंसर लावलेला पावरफूल जेट लावून ठेवला.माणूस गाडी जवळ आला की आपोआप पाण्याचे फवारे अंगावर उडतात आणि बेलचा आवाजही होतो.असंच या चोरासोबत झालं आणि चोर पळून गेला.हा सगळा जुगाड अमेरिकेतील साऊथ कॅलीफोर्नियामध्ये राहणाऱ्या कैटी कैमरेना यांनी केलाय.

व्हिडीओ पाहा - https://www.youtube.com/watch?v=a76BEWz2KxA

या हटके युक्तीमुळे चोराचा प्लान फसला.हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने फेसबुकवरून काही लोक ही मशिन कुठे मिळते हे विचारतायत.पण, ही पावरफुल जेट कुठून आणली.स्वत: बनवलीय का? याबद्दल काहीच माहिती दिलेली नाही.पण, चोरांपासून बचाव करण्यासाठी वापरलेली हटके युक्ती पाहून सोशल मीडियावर चर्चा होतेय.


संबंधित बातम्या

Saam TV Live